(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime : अटकेची धमकी देत मागितली लाच, स्वत:च फसला जाळ्यात! रोह्यात 6 हजारांची लाच घेताना फौजदारास रंगेहात पकडले
Raigad Crime : अटक नको हवी असेल तर, या तक्रारीत मदत करण्यासाठी आधी 10 हजार रुपये लाचेची मागणी सहाय्यक फौजदाराने केली होती
Raigad Crime : आधी अटकेची धमकी देत घाबरवलं, नंतर अटकेपासून सुटका करण्यासाठी तसेच मदत म्हणून 6 हजार मागितले, एका फौजदाराचा कारनामा लाचलुचपत विभागाने उघडकीस आणलाय. रायगड जिल्ह्यातील रोहा (Roha) पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार यांना 6 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. गोविंद रघुनाथ मदगे असे या फौजदाराचे नाव असून रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (Anti Corruption Bureau) सापळा रचून ही कारवाई केली आहे. यामध्ये मदगे हे सहा हजार रुपये घेत असताना त्यांना पकडण्यात आले
अटकेची धमकी देत मागितली लाच
लाचलुचपत विभाग रायगडचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांनी ही कारवाई केली असल्याची माहिती आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे वडील कांतीलाल तुकाराम वाघमारे यांनी त्यांची पत्नी प्रवीणा कांतीलाल वाघमारे यांच्याविरुद्ध 4 मार्चला वादविवाद तसेच झटापट केल्याबाबतची तक्रार रोहा पोलिसांत दिली होती. याबाबत रोहा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. हे प्रकरण कौटुंबिक व अदखलपात्र स्वरूपाचे असून देखील तक्रारदार यांची आई प्रवीणा वाघमारे हिला अटक करावी लागेल असे तक्रारदार यांना सांगून घाबरवण्यात आले होते
लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले
अटक नको हवी असेल तर या तक्रारीत मदत करण्यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी सहाय्यक फौजदार गोविंद मदगे यांनी केली होती तडजोडीअंती 6 हजार देण्याचे ठरले. या प्रकरणी रोहा बाजारपेठ पोलीस वाहतूक चौकीजवळ लाचलुचपत विभागाच्या शशिकांत पाडावे, स. फौ. विनोद जाधव, स. फौ. शरद नाईक, पो. ह. महेश पाटील, पो. ह. कौस्तुभ मगर यांच्या पथकाने सापळा रचून गोविंद मदगे यांना ही लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
हेही वाचा>>>
Kalyan : बारा हजारांची लाच घेताना सहाय्यक दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात, ठाणे अँटी करप्शन ब्युरोची कारवाई