एक्स्प्लोर

महाबीज बियाणांची दरवाढ तात्काळ मागे घ्या : विखे पाटील

मुंबई : दुष्काळात शेतकरी होरपळत असताना, महाबीजने केलेली बियाणांची दरवाढ अन्यायकारक आणि जखमेवर मीठ चोळणारी आहे. ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. एबीपी माझाच्या वेबसाईटवर याबाबतची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर, राजकीय वर्तुळाने याची तातडीने दखल घेतली आहे.   ऐन हंगामात शेतकऱ्यांना दणका शेतकऱ्यांसाठी स्वस्त आणि रास्त दरात बियाणे उपलब्ध करून देण्याचं हक्काचं ठिकाण म्हणून राज्य बियाणे महामंडळ अर्थातच महाबीजची ओळख आहे. पण शेतकऱ्यांच्या हक्काच्या या महामंडळाने यावर्षी ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. महाबीजने डाळवर्गीय बियाण्यांमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी दरवाढ केली आहे.   बाजारात सर्वच खाजगी बियाणे विक्रेत्यांनी बियाण्यांत दरवाढ केली आहे. त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्याऐवजी सरकार शेतकऱ्यांकडूनच नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांमधून या भाववाढीचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.   पीक विम्याआधी बियाण्यांची दरवाढ मागच्या वर्षीच्या खरीप हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बियाण्याला केलेला खर्चदेखील निघाला नव्हता. शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमादेखील अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. राज्यासाठी मंजूर झालेल्या पीकविम्याचं वाटप अनेक ठिकाणी अजून चालूच आहे.   सरकारने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना युद्धपातळीवर पीक विमा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याऐवजी महाबीज या सरकारी संस्थेने संधीचं सोनं करण्याचे प्रयत्न सुरु केलं आहेत.   डाळीचे वाढते भाव पाहता शेतकऱ्यांचा यावर्षी तूर, उडीद, मूग अशा डाळवर्गीय पिकांकडे कल आहे. मात्र बाजारात डाळवर्गीय बियाण्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे महाबीजने शेतकऱ्यांच्या या गरजेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.   बियाण्यांमध्ये झालेली दरवाढः   सोयाबीनः सोयाबीन बियाण्याच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. जेएस-335 या वाणाची 30 किलोची किंमत पूर्वी 1875 रुपये होती तर आता ती 2040 रुपये आहे. सोयाबीनच्या जेएस-9305 या वाणामध्येही 375 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शिवाय इतर वाणांची देखील दरवाढ करण्यात आली आहे.   मूगः मूगाच्या जवळपास सर्वच वाणांमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. कोपरगाव वाणाच्या किंमतीत किलोमागे 75 रुपयांची वाढ केली आहे, तर उत्कर्ष वाणाच्या 5 किलोमागे 300 रुपये दरवाढ केली आहे.   उडीदः उडीदाच्या टीएयू-1 या वाणाच्या 5 किलोमागे 600 रुपये दरवाढ केली आहे.   तूरः डाळीच्या वाढत्या मागणीमुळे शेतकरी यावर्षी तूर पिकाकडे वळल्यामुळे तुरीच्या बियाण्यांचा बाजारात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तुरीचा आयसीपी 8863 हा वाण प्रति किलो 80 रुपयांनी महागला आहे. तर बीडीएन 708 हा वाण प्रति दोन किलोमागे 190 रुपयांनी महागला आहे.   हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर बळीराजा खरीप हंगामासाठी पावसाची अतुरतेने वाट पाहत आहे. गेल्या चार वर्षांच्या दुष्काळात अनेक शेतकऱ्यांचा बियाण्याचा खर्च देखील निघालेला नाही. त्यातच महाबीजने अचानक केलेल्या या दरवाढीमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

संबंधित बातमी 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: दीड वर्षांचा असताना वडिलांचा मृत्यू; मारेकरी जामिनावर बाहेर येताच मुलगा सूडाने पेटला, कात्रज बोगद्यात 28 वार करुन खेळ संपवला, पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी
दीड वर्षांचा असताना वडिलांचा मृत्यू; मारेकरी जामिनावर बाहेर येताच मुलगा सूडाने पेटला, कात्रज बोगद्यात 28 वार करुन खेळ संपवला, पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी
Kushal Badrike On Rahul Deshpande: भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
भाऊ कदमांनी 'तो' प्रश्न विचारताच राहुल देशपाडेंना राग अनावर, अन्...; कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा 'तो' किस्सा
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Embed widget