एक्स्प्लोर

Zika Virus Pune : ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण

 पुण्यात प्रथमच झीकाचे रुग्ण आढळले आहेत.  कोथरूडच्या एरंडवणे भागातील एका 46  वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या 13  वर्षीय मुलीमधे झीकाची लक्षणे आढळली आहेत.

Zika Virus Case Found in Pune:  कोरोनाची डोकेदुखी संपली असली तरी, आता नव्या आजारानं प्रशासनाची चिंता वाढवली आहे. झिका व्हायरसनं (Zika Virus) डोकं वर काढलं आहे. पुण्यात (Pune)  झिका व्हायरसचे (Zika Virus Case) दोन रुग्ण आढळून आला  आहे. ऐन वारीच्या  तोंडावर  शहरात झिका व्हायरसचा  रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 46  वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या  13 वर्षीय मुलीमध्ये झीकाची लक्षणं आढळून आली आहे.  

 पुण्यात प्रथमच झीकाचे रुग्ण आढळले आहेत.  कोथरूडच्या एरंडवणे भागातील एका 46  वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या 13  वर्षीय मुलीमधे झीकाची लक्षणे आढळली आहेत. ताप आणि अंगदुखी अशी ही लक्षणे आहेत. त्यामुळे काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. डासांच्या उत्पत्तीमुळे व्हायरस पसरतो. गरोदर महिलांना या व्हायरसचा जास्त धोका आहे. त्यामुळे गरोदर महिलांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगितले आहे .झिका विषाणू जीवघेणा नसला तरी महिलांवर त्याचा मोठा फटका बसू शकतो.  सध्या स्थितीला हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.   

काय आहे झिका आजार ? (What is Zika Virus) 

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात 80  टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.

 काळजी कशी घ्याल?

  • घरात डास होऊ देऊ नका, घरातील स्वच्छतेची काळजी घ्या. मच्छरदाणीचा वापर करा.
  • घरामध्ये  साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नये व उघडे ठेवू नये
  •  हा आजार संसर्गजन्य नाही. 
  •  झिका विषाणू असलेल्या व्यक्तीला डास चावून दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्याला झिकाची लागण होते.
  • या विषाणूचा धोका महिलांसाठी जास्त आहे. 
  • घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा. 
  •  तुम्हाला डायबिटीज, हायपरटेंशन, इम्युनिटी डिसऑर्डरसारख्या समस्या असतील तर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  •  प्रवास करुन आल्यावर दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

Video :

हे ही वाचा :

 Bird Flu : गाईच्या दुधात आढळला H5N1 बर्ड फ्लूचा विषाणू; दूध पिणे कितपत सुरक्षित?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan Attacked

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Embed widget