PCMC Crime News: पुण्यात खूनाचं सत्र संपेना! दुकानदार महिलेची अज्ञाताकडून गळा चिरुन हत्या; आरोपी फरार
पिंपरी-चिंचवडमध्ये दुकान मालक असलेल्या महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरात घडली. पूजा देवी प्रसाद असे मृत महिलेचे नाव आहे.
PCMC Crime News: पिंपरी-चिंचवडमध्ये दुकान मालक असलेल्या महिलेचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरात घडली. पूजा देवी प्रसाद असे मृत महिलेचे नाव आहे. पूजाचे ‘प्रगती कलेक्शन’ नावाचे दुकान होते. याच दुकानात ही घटना घडली. खून करु आरोपी पसार झाला आहे. भोसरी पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.
पूजाने सकाळी साडेनऊच्या सुमारास दुकान उघडून साफसफाई केली. काही वेळातच सकाळी दहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दुकानात घुसून पूजाच्या मानेवर चाकूने वार केले. त्यांच्यात बाचाबाची झाली. पूजाने हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला आणि दुकानाबाहेर काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला. मात्र जास्त रक्तस्त्राव झाल्याने पूजा दुकानाबाहेर कोसळली. वार करुन आरोपीने पळ काढला. पूजाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी पुजाला मृत घोषित केलं. पूजाचे कुटुंब गेल्या 20 ते 25 वर्षांपासून भोसरी परिसरात राहत आहेत. पुण्यातील खूनाच्या गुन्हांच्या प्रमाणात काही महिने झाले प्रचंड वाढ झाली आहे. रोज अशा खूनाच्या अनेक घटना पुढे येत आहेत.
पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा खून
पुण्याच्या (pune) बावधन परिसरात पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पीतबसा कमलचंद जानी असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव होतं. याप्रकरणी प्रदीप बलभीम राजोळे, आकाश कांबळे, आकाश पवार यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारच्या रात्री आठच्या सुमारास पीतबसा यांच्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. त्यांच्या डोक्यात, हातावर वार करण्यात आलेत. आरोपी फरार असून त्यांचा शोध हिंजवडी पोलीस घेत होते.
पीतबसा कमलचंद जानी यांचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होोता. पुण्यातील बावधन परिसरात या खूनामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या सगळ्यात जुने वाद टोकाला गेल्याने खून केल्याचं स्पष्ट झालं होतं. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.