एक्स्प्लोर
निगडीमध्ये क्षुल्लक वादातून पत्नीकडून पतीची हत्या
निगडी (पिंपरी) : पिंपरी-चिंचवडमधील निगडीमध्ये यमुनानगर परिसरात सासू, सासरे आणि पत्नीनं पतीची हत्या केली आहे. शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून पत्रेस जॉन मनतोडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मद्यपान करून पत्रेस पत्नी क्रिस्टीनाच्या घरी आला होता.त्याने घराच्या बाहेर थांबून पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. चिडलेली पत्नी घराबाहेर आली. आई वडिलांसह घराच्या खाली आल्यावर पत्नीचं पतीसोबत किरकोळ भांडण सुरु झालं. याच भांडणाचं पर्यावसान हाणामारीत झाले.पत्नी क्रिस्टिनानं पतीच्या अंगावर मिरची पूड टाकली आणि जमिनीवर पडलेला सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घातला. तसंच सासू सासऱ्यांनीही जावयाला मारहाण केली.
मारहाणीत पत्रेसच्या डोक्याला गंभीर जखमी झाली. त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पत्रेसच्या हत्येप्रकरणी पत्नी,सासू आणि सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
पत्रेस हा क्रिस्टिनाचा पती होता, मात्र तो पत्नीपासून वेगळा राहात होता. गेल्या काही वर्षांपासून जॉन हा पत्नीला सासरी येऊन मारहाण,शिवीगाळ आणि मानसिक त्रास द्यायचा.यामुळे क्रिस्टीनाच्या आई वडिलांना याचा त्रास व्हायचा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement