Vasant More : साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर वसंत मोरे यांचं ट्वीट
'अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे,' असं म्हणत वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांनची मनसे पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलं.
पुणे : राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे आपली अडचण झाल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी पत्र काढत साईनाथ बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचं म्हटलं. यावर वसंत मोरे यांनी ट्वीट करुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांचं अभिनंदन केलं आहे. "अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे" कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई!"असं ट्वीट वसंत मोरे यांनी केलं आहे.
"अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे " कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड!
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 7, 2022
खूप खूप अभिनंदन साई!@Sainathbabar7 pic.twitter.com/Qkar8mCakS
साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती
पुणे मनसेतील (Pune MNS) नाराजी नाट्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील प्रमुख नेत्यांना आज (7 एप्रिल) मुंबईत बोलावलं होतं. राज ठाकरेंच्या भाषणावर नाराजी व्यक्त करणाऱ्या वसंत मोरे यांना मात्र मुंबईला बोलावण्यात आलं नव्हतं. अखेर वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. राज ठाकरेंनी पत्र काढत साईनाथ बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे.
'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा', असं या नियुक्तीपत्रात म्हटलं आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते नाराज झाल्याचं दिसून आलं. काही कार्यकर्त्यांनी राजीनामे देखील दिले होते.
माझ्या प्रभागात शांतता हवी, त्यामुळे हनुमान चालीसा लावणार नाही : वसंत मोरे
वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर म्हटलं होतं की, "माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने हनुमान चालीसा लावणार नाही. सोबतच राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचेही त्यांनी म्हटलं. आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली. परंतु, सध्या रमजान सुरु असल्याने मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही. याचा अर्थ मी राज ठाकरे किंवा पक्षावर नाराज आहे, असा मुळीच नाही, असेही वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं होतं.
संबंधित बातम्या
Vasant More : नाराजी भोवली! वसंत मोरेंची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश