एक्स्प्लोर

वरावरा राव यांना पुणे पोलिसांकडून हैदराबादमधून अटक

महाराष्ट्र पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांमधील वरवरा राव, अरुण फरेरा, वर्नोन गॉन्जाल्विस, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा यांना कोरेगाव भीमा प्रकरणी 28 ऑक्टोंबरला अटक केले होते. तेंव्हापासून या पाच जणांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.

पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या वरावरा राव यांना पुणे पोलिसांनी हैदराबादमधून अटक केली आहे. वरावरा राव यांची हाऊस अरेस्टची मुदत वाढवण्याची विनंती हैदराबाद न्यायालयाने अमान्य केली होती. त्यामुळे त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज रात्री पुण्यात आणले जाण्याची शक्यता आहे. उद्या कोर्टात हजर करणार असल्याचेही सूत्रांकडून कळले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांमधील वरवरा राव, अरुण फरेरा,  वर्नोन गॉन्जाल्विस, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा यांना कोरेगाव भीमा प्रकरणी 28 ऑक्टोंबरला अटक केले होते. तेंव्हापासून या पाच जणांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. गुरुवारीच पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित दहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहा जूनला अटक झालेल्या पाच जणांविरुद्ध आणि पाच फरार असलेल्या आरोपींविरुद्ध 5,160 पानांचे दोषारोपपत्र ‌दाखल करण्यात आले आहे. सहा जूनला अटक झालेल्या सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन आणि फरार असलेले कॉम्रेड मिलिंद तेलतुंबडे, किशनदा बोस, प्रकाश उर्फ ऋतुपर्ण गोस्वामी, कॉम्रेड दीपू आणि कॉम्रेड मंगलू यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात गुन्हा नोंद झालेल्या सुधा भारद्वाज, व्हर्नन गोन्सालवीस, अरुण फरेरा, गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्या विरोधातील खटल्याची सुनावणी सुरू असल्याने त्यांच्याविरोधात नंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणार आहे. दोषारोपपत्र दाखल झालेल्या दहा जणांनी सीपीआय माओईस्ट या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या निर्देशानुसार एल्गार परिषद आयोजित केली. या एल्गार परिषदेमुळे दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात वाढ झाली. रोना विल्सन आणि फरार असलेल्या कॉम्रेड प्रकाश यांच्यात ई मेल द्वारे झालेल्या चर्चेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाची चर्चा झाल्याचे समोर आले. अरुण फरेरा याने खैरलांजी हत्याकांडाच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनात लोकांना जमवाजमव करण्यास मदत केली होती, असे सांगण्यात आले आहे. कोरेगाव-भीमामध्ये काय घडलं होतं? कोरेगाव-भीमा रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 1 जानेवारीला विजय दिवस साजरा करण्यात आला. कोरेगाव-भीमा गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. कुणावर झाले गुन्हे दाखल? या हिंसाचाराप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. दुसरीकडे, एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एल्गार परिषदेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये कबीर कला मंचचा समावेश करण्यात आला. कबीर कला मंचाने एल्गार परिषदेत सादर केलेल्या गीतांतून लोकांना चेतवल्याचा गुन्हा पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Delhi Meeting | राज्यात 7 कॅबिटने, 2 राज्यमंत्रिपदासाठी अजितदादा आग्रहीGadchiroli Earthquake | गडचिरोलीत सकाळदरम्यान भूकंपाचे धक्के, CCTV व्हिडिओ!Earthquake Bhandara | गडचिरोली, भंडारा, गोंदियात भूकंपाचे धक्के, तेलंगणात भूकंपाचं केंद्रस्थानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Embed widget