एक्स्प्लोर

Vande Bharat Express: पुणे रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरुन कशामुळं घसरला? प्राथमिक कारण समोर; सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अपडेट

Vande Bharat Express Coach Derail : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा एक डबा पुणे जंक्शन जवळ रुळावरुन घसरल्याची घटना घडली आहे.

Vande Bharat Express Coach Derail पुणे : मुंबईवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा अपघात पुणे स्टेशनच्या  प्लॅटफॉर्म नंबर 3 वर येत असताना झाला आहे. यामुळं प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येणाऱ्या ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले. वंदे भारत एक्स्प्रेसचा रुळावरुन घसरलेला डबा पूर्ववत करण्याचं काम सुरु आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या अपघाताचे प्राथमिक कारण समोर आलं आहे.

वंदे भारत एक्सप्रेसच्या अपघाताचं प्राथमिक कारण समोर

 वंदे भारत एक्स्प्रेस मुख्य लाईन वरून प्लॅटफॉर्म क्रमांक तीनच्या दिशेने जात असताना ट्रेन चा डबा रुळावरून घसरला, अशी माहिती रेल्वे दलातील विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.  मुंबईहून पुणे रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर येत असताना हा अपघात झाला. मुख्य लाईनवरून ट्रेनचे इंजिन पुढे जात असताना 15  नंबरच्या डब्याने ट्रॅक बदलला नसल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती आहे.  

सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवी ट्रेन

मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पुणे जंक्शन जवळ अपघात झाल्यानं सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई सोलापूर वंदे भारत मधून प्रवाशांसाठी सोय करण्यात येणार आहे.  लवकरच नवीन ट्रेन सोलापूरला जाण्यासाठी येणार आहे. सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रवाशांना प्लॅटफॉर्म वर जाण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सोलापूरला जाण्यासाठी नवीन गाडी थोड्याच वेळात दाखल होणार आहे.  प्लॅटफॉर्म नंबर ३ वगळता इतर प्लॅटफॉर्म वरील सेवा सुरळीत असल्याची माहिती आहे. 

कुली बांधवांनी दाखवली माणुसकी

मुंबई–सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस गाडी पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना तिचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सुरू असून, प्रवासी आपले सामान घेऊन रुळावरून पुढे जाताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे, नेहमी प्रवाशांचे सामान वाहून नेण्यासाठी शुल्क घेणारे कुली आज मात्र मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कोणतेही मानधन न घेता ते प्रवाशांचे सामान उचलून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवत आहेत. या कुलींच्या कृतीतून खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडत आहे.

रेल्वेकडून अपघाताची चौकशी केली जाणार

मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या पुण्या जवळ झालेल्या अपघाताबत चौकशी केली जाणार आहे. पुणे रेल्वे स्टेशन जवळ झालेल्या अपघाताची चौकशी केली जाणार आहे. मध्य रेल्वे विभागाकडून अपघाताची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघातात सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाही. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व ट्रेन इतर प्लॅटफॉर्म वरून वळवण्यात येत आहेत. इतर प्लॅटफॉर्म वरून ट्रेन वळवण्यात येत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे प्लॅटफॉर्म वर पोहोचण्यापूर्वी अपघात झाला असल्याने इतर गाड्यांना उशीर लागण्याची शक्यता आहे

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ashleigh Gardner Controversy : मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
मला फसवले, आता संघातील खेळाडूसोबत अफेअर; ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारावरील आरोपाने खळबळ, नेमकं प्रकरण काय?
Embed widget