Vaishnavi Hagawane death : वैष्णवीचा पती शशांक हगवणेचा कारनामा, वहिनीला मारहाण करून पळाल्याचा CCTV समोर
Vaishnavi Hagawane death : वैष्णवीप्रमाणेच तिच्या मोठ्या जावेचा देखील हगवणे परिवार छळ करत असल्याची मारहाण करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पिंपरी: सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय वर्षे 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिस सुरू आहे. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. या प्रकरणानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे, तर वैष्णवीच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला आहे. वैष्णवीप्रमाणेच तिच्या मोठ्या जावेचा देखील हगवणे परिवार छळ करत असल्याची मारहाण करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीचा नवरा शशांक याने हगवणे घरातील मोठी सून मयुरीला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
काय आहे सीसीटीव्हीमध्ये?
वैष्णवी हगवणे यांचे पती शशांक हगवणे हे मोठ्या भावाची बायको मयुरी जगताप हिला मारहाण करून पळत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे. शशांक हगवणे हा वहिनी मयुरी जगताप यांचा मोबाईल घेऊन पळत जाताना दिसत आहे. मयुरी जगताप या राजेंद्र हगवणे यांची मोठी सून आहेत. मयुरी हगवणे हिलाही मारहाण केली म्हणून पौड पोलिसात गुन्हा दाखल आहे.
मयूरीच्या भावाने एबीपीशी बोलताना CCTV दाखवला
रात्रीच्या दरम्यान आम्हाला फोन आला की, मला मारहाण केलेली आहे. त्यावेळेस आम्ही पोलीस ठाण्यात गेलो तर आमच्यात आणि त्यांच्यात बाचाबाची देखील झाली. आम्ही तक्रार दाखल केली. शशांक हगवणे हे मोबाईल घेऊन पळून जातानाचे आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्या वेळेस भांडण सुरू होते ते त्यावेळेस बहिणीने लाईव्ह वगैरे केले होते, त्याचे व्हिडीओ देखील आमच्याकडे आहे, असे म्हणत मयुरी यांच्या भावाने मयुरीला शशांक हगवणे याने मारहाण केल्याचा सीसीटीव्हीच दाखवला.
नेमकं प्रकरण काय?
सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता.
वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.























