एक्स्प्लोर

Parth Pawar Land : पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या जमिनाचा व्यवहार प्रकरणात अपडेट; समितीचा अहवाल सादर होणार, काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष

Parth Pawar Land : याप्रकरणी सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित केलं होतं आणि त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल केला. या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी चार सदस्यिय समिती नेमली होती.

पुणे: मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार प्रकरणाचा (land transaction case) अहवाल सोमवारी सादर होणार आहे. दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासण्यासाठी प्रभारी नोंदणी महानिरीक्षकांनी नेमलेल्या समितीचा अहवाल सोमवारी सादर होणार आहे. अहवालाबाबत अंतिम कामकाज सोमवारपर्यंत पूर्ण होऊन अहवाल सादर करण्यात येईल, नोंदणी विभागाकडून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील आणि पावर ऑफ अटॉर्नी (Power of Attorney) शीतल तेजवानी यांच्यात ३०० कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाला होता. मात्र, ही जमीन सरकारी असल्याने हा व्यवहार बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर याप्रकरणी सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित केलं होतं आणि त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल केला. या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी चार सदस्यिय समिती नेमली होती. त्याचा अहवाल सोमवारी सादर होणार आहे.(land transaction case)

Parth Pawar Land : कोरेगाव पार्क, बोपोडी जमीन प्रकरण शीतल तेजवानीसह चौघांना नोटीस

कोरेगाव पार्क आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात पोलिसांनी शीतल तेजवानी, हेमंत गवंडे यांच्यासह चौघांना जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. या प्रकरणात गवंडे हे शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. त्यांनी जबाब नोंदविला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार संचालक असलेल्या 'अमेडिया' कंपनीवर बोपोडी, कोरेगाव पार्क भागातील जमीन प्रकरणात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. बोपोडी जमीन प्रकरणात 'अमेडिया' कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांचा संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. या प्रकरणाचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. 

सरकारी विभागांकडून जमीन व्यवहाबाबत झालेल्या कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. त्यानंतर या प्रकरणात शीतल तेजवानी, हेमंत गवंडे, तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह चौघांना जबाब नोंदविण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी गवंडे हे आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. जबाब नोंदविल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बोपोडी प्रकरणात माझ्यावर चुकीने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबतची कागदपत्रे पोलिसांना मी दिली आहे. मी पोलिसांना सहकार्य करीत आहे

Parth Pawar Land : गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी तेजवानी न्यायालयात

या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी शीतल तेजवानीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत तिने अर्ज केला असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

 

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आरजू बिष्णोई टोळीच्या शूटर्सना हरिद्वारमध्ये बेड्या, पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई
आरजू बिष्णोई टोळीच्या शूटर्सना हरिद्वारमध्ये बेड्या, पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई
डिव्हायडरचा पत्रा थेट गाडीत घुसला, पुणे मुंबई एक्सप्रेसवे वर भीषण अपघात, दोघांचा जागीचं मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी
डिव्हायडरचा पत्रा थेट गाडीत घुसला, पुणे मुंबई एक्सप्रेसवे वर भीषण अपघात, दोघांचा जागीचं मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी
Pune Crime Ravi Landge: पिंपरीचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी, थेट सीपी ऑफिसमध्ये फोन, महापौर म्हणाले, 'आधी दोन वेळा भेटलेला; पुस्तकही भेट दिलं...'
पिंपरीचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी, थेट सीपी ऑफिसमध्ये फोन, महापौर म्हणाले, 'आधी दोन वेळा भेटलेला; पुस्तकही भेट दिलं...'
NEET Paper Leak : ब्यूटी पार्लर ते नीट पेपरफुटी...वाघमारे आणि मांढरेने विद्यार्थ्यांना दिलेली ती ट्रिक, निवासस्थानी काय काय घडायचं?
ब्यूटी पार्लर ते नीट पेपरफुटी...वाघमारे आणि मांढरेने विद्यार्थ्यांना दिलेली ती ट्रिक, निवासस्थानी काय काय घडायचं?

व्हिडीओ

Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
NCP Merger Sharad Pawar Sunetra Pawar : पडदा विलिनीकरणावर लक्ष 'पवार 'नीतीवर Special Report
Rahul Gandhi Sharad Pawar on PM Modi काँग्रेसचे बोल कडवे,पवारांनी गायले गोडवे Special Report
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Re-Exam : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उच्चस्तरीय सुरक्षा बैठक; फेक टेलिग्राम चॅनेल्सवर कारवाईचे आदेश
NEET : फेक टेलिग्राम चॅनेल्सवर होणार मोठी कारवाई, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे कडक निर्देश
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
Giorgia Meloni : 'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
Ladki Bahin Yojana : मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
EPFO : 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
BAN vs PAK : बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश, पाकिस्तानचा पराभव आणि भारताला WTC मध्ये मोठा धक्का
बांगलादेशसमोर पाकिस्तानचा दोन्ही कसोटीत पराभव, इकडे टीम इंडियाला मोठा धक्का, काय घडलं?
Embed widget