एक्स्प्लोर

Sharad Pawar: मुंबईत उद्धव ठाकरेंचे प्राबल्य, मनपा निवडणुकीबाबत चर्चा करू, शरद पवारांचे मोठं भाष्य

Sharad Pawar: आज शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना महानगरपालिका निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. यावेळी सर्वजण मिळून चर्चा करू असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुणे: राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकाकडे लागलं आहे. अशातच जागावाटप, चर्चा, गाठीभेटी, पक्षप्रवेश, दावे यामुळे देखील राजकारण चांगलच तापलं आहे, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणुका लढण्याबाबत मोठं भाष्य केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आम्ही अजून काही ठरवलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.साधारपणे 3 महिन्यात निवडणूक लागेल. आम्ही अजून चर्चा केली नाही. आम्ही काँग्रेस, उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (Uddhav Thackeray Shivsena) आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित बसून त्याबाबतची चर्चा करू. पण निवडणूक एकत्र लढण्याची इच्छा आहे, असं शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, मुंबईत उध्दव ठाकरे यांचे प्राबल्य आहे. त्याच्यामुळे मुंबईत एकत्र लढायचं का नाही ते बसून ठरवू. मुंबईत आम्हा सर्वांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्याचबरोबर साधारपणे 3 महिन्यात निवडणूक लागेल. आम्ही अद्याप लढण्याबाबत चर्चा केलेली नाही. आम्ही सर्वजण मिळून चर्चा करू. त्यामध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, आम्ही स्वतः आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित बसू असंही पुढे शरद पवार म्हणालेत.

हिंदीची सक्ती असू नये, पण...

राज्यातील पहिली इयत्तेपासून विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यावरून विरोध दर्शवला जात आहे, याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, हिंदी भाषेची सक्ती असू नये, पण हिंदीचा द्वेष करणं हेही विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही. त्यामुळे पालकांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी निर्णय घ्यावा, अशी व्यवस्था असावी," अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे. तसंच "एक गोष्ट दुर्लक्षित करू नये की, या देशातील 55 ते 60 टक्के लोक हिंदी भाषा बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्यासाठी हिंदीकडे दुर्लक्ष करू नये. पण असं असलं तरीही हिंदीची सक्ती मात्र योग्य नाही," असंही पवार म्हणाले.

PDCC बँकेवर बोलताना म्हणाले...

लोकसभा निवडणुक झाली त्यावेळी बँक उघडलेली होती. आज या बॅंकेमध्ये हे दुसऱ्यांदा घडत आहे. बॅंक कशी उघडी होती. बॅंकेचे नेतृत्व करणारे लोक आहेत, त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी ती बॅंक कशाला उघडेल. एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये आपल्याला दुसऱ्यांदा दिसते आहे. याचा अर्थ काय समजायचा तो समजा असंही पुढे शरद पवार म्हणाले आहेत. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget