एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Udayanraje Bhosale : आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

Udayanraje Bhosale : प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा उदयनराजे भोसले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला.

Udayanraje Bhosale : प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा टोला उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) लगावला आहे. शिवसेना माझी आहे, असं मी म्हणू का? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. आता जे एकत्र आले आहेत ते कायमस्वरुपी एकत्र राहतील, असं दिसतंय असेही ते यावेळी म्हणाले. उदयनराजे भोसले यांनी आज कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांची पुण्यात भेट घेतली.

विकासकामांसाठी भेट घेतली 

राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा, महाबळेश्वरमध्ये आणखी कोणती विकासकामे करता येतील याबाबत चर्चा केल्याचे उदयनराजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दीपक केसरकर आज पुणे दौरा करून सातारमध्ये जाणार आहेत. त्यानंतर कोल्हापूरमध्ये मुक्काम करून उद्याही ते कोल्हापूरमध्ये असतील. त्यानंतर ते सिंधुदुर्गला रवाना होतील. त्यामुळे मी आज सातारमध्ये नसल्याने आज त्यांची पुण्यात भेट घेतल्याचे उदयनराजे यांनी यावेळी नमूद केले.   

मग माझी शिवसेना म्हणू का?

जेव्हा लोक विचाराने एकत्र येतात तेव्हा त्याना एकत्र ठेवण्यासाठी कोणतीही ताकद वापरावी लागत नाही. आता जी एकत्र आलेत ते कायमस्वरुपी एकत्र राहतील, असं दिसतंय, असेही ते यावेळी म्हणाले. शिवसेना ठाकरेंची की शिंदे गटाची? असा प्रश्न विचारला असता उदयनराजे यांनी संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, शिवसेना माझी आहे असे मी म्हणू का? असे त्यांनी उत्तर दिले. 

कोणाला मंत्रिपद द्यावे कोणाला नाही ते देणाऱ्यांनी ठरवावे, मी त्या ठरवणाऱ्यांमध्ये नाही, असे त्यांनी मंत्रिपदाच्या प्रश्नावरून उत्तर देताना सांगितले. मराठा आरक्षणावर नुसतेच पाट्या लावून फिरतात. देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनाच जातीयवादी म्हणतात. मी जातपात बघत नाही. शिवाजी महाराजांनी जातपात पाहिली नाही, मग मी कसा पाहीन? असेही उदयनराजे म्हणाले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :2 डिसेंबर 2024: ABP MAJHAABP Majha Headlines :  9 AM : 2  डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Special Report : सरकार स्थापनेआधीच महायुतीत 'गृह'कलह ?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Champions Trophy 2025 : पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
पाकिस्तानची पोलखोल! चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत शोएब अख्तरने केला मोठा गौप्यस्फोट; पहा VIDEO
Mumbai Crime: मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग, मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर 56 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, EVM मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाचा हट्ट सोडला नाही तर काय होणार? महायुतीची मुंबईतील बैठक निर्णायक
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
2024 मध्ये करिअरचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, आता 37व्या वर्षी अभिनयातून संन्यास घेण्याची घोषणा; विक्रांत मेस्सीची शॉकिंग पोस्ट
"आता घरी परत जाण्याची वेळ..."; विक्रांत मेस्सीनं इंडस्ट्री सोडली? अभिनयातून संन्यास घेत असल्याची इंस्टाग्रामवर पोस्ट
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Embed widget