एक्स्प्लोर

Sushma Andhare : ससून ड्रग्ज प्रकरणात दादा भुसेंसोबत दोन मंत्र्यांचा सहभाग; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट

ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणात मंत्री दादा भुसे यांच्या सोबत अजून दोन मंत्र्यांचा समावेश आहे, असा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केला आहे.

पुणे : ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणात (Sasoon Hospital Drug Racket) मंत्री दादा भुसे (dada bhuse) यांच्या सोबत अजून दोन मंत्र्यांचा समावेश आहे, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे  (sushma andhare) यांनी केला. त्यासोबतच या दोन्ही मंत्र्यांची नावं लवकरच पुढे आणू, असंही त्या म्हणाल्या. मंत्रीपदावर असताना कोणत्याही प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होऊ शकत नाही, त्यासाठी त्यांनी मंत्रीपदावरुन पायउतार झाला पाहिजे आणि त्यानंतरच त्यांनी चौकशी केली पाहिजे. त्यानुसार दादा भुसेंना मंत्रीपदावरुन पायउतार करावं लागेल आणि नंतरच या ड्रग्ज प्रकरणी त्यांनी चौकशी करावी लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही अनेक गोष्टींचा पाठपुरावा करत आहोत. यात आम्हाला राजकरण आणायचं नाही. ललित पाटील याच्यावर काय उपचार सुरू होते याची माहिती द्या. गृहमंत्री आम्हालाही कायदा माहिती आहे. कुठली माहिती गोपनीय आणि कुठली ओपन करावी हे आम्हाला माहिती आहे. देशाच्या सुरक्षेच्या संबंधित माहिती सांगता येत नाही, ललित पाटील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय हे सांगू नका. पण उपचार काय सुरू होते हे तरी सांगा.

नाशिकमध्ये ड्रग्जचे कारखाने आले कुठून?

दादा भुसे याचं नाव आम्ही घेतलं आणि सगळ्यांनी आमच्यावर आरोप केले. भुसेंच्या नाशिकमध्ये ड्रग्जचा एवढा मोठा कारखाना उभा कसा राहिला?,असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या ड्रग्ज प्रकरणाला पालकमंत्री देखील जबाबदार आहेत. अशा बेजबाबदार पालकमंत्र्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

ललिल पाटीलने दुबईत सगळ्यांना पार्ट्या दिल्या...

मंत्री आणि पदाधिकारी या सगळ्या लोकांच्या दुबईत पार्ट्या झाल्या. या पार्ट्या ललित पाटीलने दिल्या होत्या. याची सगळी माहिती आम्हाला आहे. ललित पाटील अनेक दिवसांपासून ससून जवळच्या हॉटेलमध्ये राहत होता. मात्र कुणाच्या नावावर राहत होता. याची कोणतीही माहिती अजून समोर आली नसल्याचं त्या म्हणाल्या. 

गृहमंत्री प्रकरण रफादफा करण्याच्या तयारीत...

या प्रकरणात ससून रुग्णालयातील डीन संजीव ठाकूर यांना पदावर राहण्याचा आधिकार नाही. विवेक अरहाना याचंदेखील या प्रकरणी नाव येत आहे. एक आणि दोन वर्ष हे कैदी नेमके कशावर उपचार घेत असतात, याची माहिती दिली पाहिजे. या प्रकरणी जो चालक पोलिसांची ताब्यात घेतला आहे तो अरहना यांचा चालक आहे. एवढे दिवस झाले पण राज्याचे गृहमंत्री यावर काहीही बोलायला तयार नाहीत. हे सगळ प्रकरण रफादफा करण्याचं काम सुरू आहे, असे आरोपही त्यांनी सरकारवर केले आहे. 

अजित पवारांकडून अपेक्षा....

अजित पवार यांच्यावर आमचा विश्वास अजित पवार यांनी यात लक्ष घालावं ही आमची अपेक्षा आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अजून कुठला पक्ष फोडण्यात व्यस्त असतील म्हणून यावर बोलत नसतील पण अजित पवार यांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी अजित पवारांकडे केली. 

संजीव ठाकूरांची नार्को टेस्ट करा...

संजीव ठाकूर यांचं निलंबन करा आणि त्यांची नार्को टेस्ट करा. त्यानंतरच या प्रकरणात अनेक मंत्र्यांची नावे समोर येतील. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करा अन्यथा या सगळ्या प्रकरणी महविकास आघाडी 24 तारखेला रस्त्यावर उतरून मोर्चा काढणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  24 तारखेनंतर संजीव ठाकूर यांना आम्ही कामं करु देणार नाही, असंही त्यांनी सरकारला खडसावलं आहे.

इतर महत्वाची बातमी-

Sasoon Hospital Drug Racket : ससूनची चौकशी समिती म्हणजे फार्स, निवृत्त न्यायमूर्तींनी चौकशी करावी; आमदार रविंद्र धंगेकरांची सरकारवर टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget