Sharad Mohol murder case : गँगस्टर शरद मोहोळ हत्याकांडात दोन वकिलांना सुद्धा बेड्या; सहा आरोपींना पाच दिवसांची कोठडी
Pune Crime : एकूण 8 आरोपींपैकी 2 आरोपी वकील आहेत. आज कोर्टात जोरदार युक्तिवाद देखील करण्यात आला. या सहा आरोपींचा वकीलपत्र आम्ही घेतलं होतं म्हणून आम्हाला अटक करण्यात आली.
पुणे : पुण्यातील (Pune Crime) कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची (Sharad Mohol murder case) दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्यानंतर पुणे पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली. अटकेतील आरोपींमध्ये दोन वकिलांचा सुद्धा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणात मुख्य आरोपीसह 6 आरोपींना 10 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 2 वकिलांना मात्र केवळ 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. काल (5 जानेवारी) पुण्यातील कोथरूड परिसरात गोळ्या घालून शरद मोहोळची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना काल रात्री अटक केली होती. एकूण 8 आरोपींपैकी 2 आरोपी वकील आहेत. आज कोर्टात जोरदार युक्तिवाद देखील करण्यात आला. या सहा आरोपींचा वकीलपत्र आम्ही घेतलं होतं म्हणून आम्हाला अटक करण्यात आली.
मान 15 गुन्ह्यांमध्ये अट्टल गुन्हेगार
शरद मोहोळ हा सुमारे 15 गंभीर गुन्ह्यांमध्ये अट्टल दहशतवादी गुंड म्हणून ओळखला जातो. मोहोळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेराव यांच्यावर जून 2012 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कतील सिद्दीकी याचा येरवडा तुरुंगात गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. जानेवारी 2010 मध्ये गुंड किशोर मारणेच्या हत्येप्रकरणी शरद मोहोळचेही नाव होते. दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला व त्याच्या सहा साथीदारांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 2021 मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
शरद मोहोळच्या पत्नीचा भाजपत प्रवेश
किशोर मारणे हा गणेश मारणेचा जवळचा सहकारी होता. पौड रोडवर 4 ऑक्टोबर 2006 रोजी गुंड संदीप मोहोळच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी होता. गणेशला अटक झाल्यानंतर किशोरने टोळी चालवण्यास सुरुवात केली, पण किशोरला शरद मोहोळने संपवल्याचा आरोप आहे. शरद मोहोळची पत्नी स्वातीने भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. शहरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये हे जोडपे दिसले होते. कोथरूडमधील स्वरद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मोहोळवर पुणे शहर आणि ग्रामीण भागातील विविध पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. येरवडा तुरुंगात इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित दहशतवादी मोहम्मद कतील सिद्दीकी याच्या हत्येप्रकरणी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. 2011 मध्ये पौड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरण, खंडणी आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहोळ आणि इतर सात जणांची पुणे सत्र न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली.
इतर महत्वाच्या बातम्या