एक्स्प्लोर
सिंहगड किल्ला पुढील चार दिवस पर्यटकांसाठी बंद
‘पाऊस असल्याने या रस्त्यावर आणखी दरड कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सिंहगडावर जाणं टाळून सहकार्य करावं,’ असं आवाहन हवेलीचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी केलं आहे.
पुणे : सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी पुढील चार दिवस बंद ठेवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील दरड हटवण्यात अडचणी येत असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं आहे.
सिंहगड घाट सुरु होण्यासाठी अजून दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे, असंही प्रशासनाने सांगितलं आहे. ‘पाऊस असल्याने या रस्त्यावर आणखी दरड कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सिंहगडावर जाणं टाळून सहकार्य करावं,’ असं आवाहन हवेलीचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी केलं आहे.
यामुळे पावसाळ्यात सिंहगड किल्ल्याचं सौंदर्य अनुभवायची इच्छा असणाऱ्या पर्यटकांना आता काही दिवस वाट पाहावी लागेल.
दरम्यान, सिंहगड घाटात काल पहाटे दरड कोसळली. सुदैवाने पहाटेच्या वेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने जीवितहानी टळली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement