एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 900 कोटींची अतिरिक्त टोल वसूली?
मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 900 कोटींचा जास्तीचा टोल वसूल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीनं टोल संबंधी दिलेल्या आकडेवारीनुसार आयआरबीनं गेल्या 10 वर्षात 900 कोटी रुपयांचा जास्तीचा टोल जमा केल्याची आकडेवारी समोर आली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आयआरबी कंपनीच्या मार्फत 2004 मध्ये टोलवसूली सुरु झाली. मात्र मागील 10 वर्षात ठरवून दिलेल्या टोल मर्यादेपेक्षा तब्बल 900 कोटी रुपये टोलच्या माध्यमातून जमा झालेत. 2007-08 ते 2016-17 या कालावधीत 1800 कोटी रुपयांची टोसवसूली करणं अपेक्षित होतं. मात्र डिसेंबर 2016 मध्ये समोर आलेल्या आकडेवारीतून या कालावधीत एकूण टोलवसूली 2700 कोटी रुपये झाल्याचं स्पष्ट झालं.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोलसंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता विवेक वेलणकर यांनी यासंबंधी आकडेवारी मागितली होती. "आयआरबी आणि एमएसआरडीसीमधील करारानुसार मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवरील एकूण टोलवसूली 2869 कोटी रुपये आहे. ही टोलवसूली 2019 पर्यंत सुरु राहणार आहे. जर 2019 पूर्वी टोलची रक्कम वसूल झाली तर टोलवसूली बंद करण्याची कोणतीही तरतूद या करारामध्ये नाही" अशी माहिती विवेक वेलणकर यांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement