एक्स्प्लोर

कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांकडून एक लाख रुपयांची लूट केल्याप्रकरणी तीन डॉक्टरांना बेड्या 

मोफत असलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णावर उपचारासाठी या डॉक्टरांनी एक लाख रुपये आकारल्याचं समोर आलं आहे. या कारवाईमुळे मोफत बेडवर उपचार मिळवण्यासाठी काही डॉक्टर लूट करत असल्याचं समोर आलं आहे.

 

पिंपरी चिंचवड : मोफत बेडवर उपचार देण्यासाठी एक लाख रुपये घेऊन लूट केल्याप्रकरणी तीन डॉक्टरांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. पालिकेच्या ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करताना हा धक्कादायक प्रकार घडल्याचं आता स्पष्ट झालंय. पालिकेने ज्या फॉर्च्युन स्पर्श हेल्थकेअर संस्थेला रुग्णांना सेवा देण्याचा ठेका दिलाय. त्या संस्थेच्या डॉ. प्रवीण जाधव, चिंचवड येथील पद्मजा या खाजगी हॉस्पिटलचे डॉ. सचिन कसबे आणि डॉ. शशांक काळे अशा तिघांचा यात समावेश आहे. 

23 एप्रिलला चिखली येथील एका महिलेला आयसीयू बेडची गरज होती. त्यांनी पद्मजा हॉस्पिटलशी संपर्क साधला होता. तेव्हा डॉ. कसबे आणि काळे यांनी आमच्याकडे बेड नाही पण आम्ही तुम्हाला एका ठिकाणी बेड उपलब्ध करून देऊ. पण त्यासाठी एक लाख रुपये लागतील असं म्हटलं. संबंधित महिला रुग्णाची तब्येत खालावत असल्याने, तातडीनं बेड मिळणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी पैसे देण्याची तयारी दाखवली. तेव्हा डॉ. कसबे आणि डॉ. काळे यांनी ऑटो क्लस्टर कोविड हॉस्पिटलच्या डॉ. प्रवीण जाधवला भेटायला सांगितले. त्यांनी बेडची व्यवस्था केल्याचं ते म्हणाले. 

पण गेल्या काही तासांपासून याच ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत इथं बेड उपलब्ध झाल्यानं, त्यांना धक्का बसला. पण आधी रुग्णाला उपचार मिळणं गरजेचं असल्याने, त्यांनी बेडला प्राधान्य दिलं. तत्पूर्वी डॉ. प्रवीण जाधवच्या माणसाने त्यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. ही बाब त्यांनी नगरसेवकांना सांगितली आणि त्यानंतर ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमध्ये गदारोळ झाला. याचे पडसाद 30 एप्रिलच्या सर्व साधारण सभेत उमटले. 

तब्बल सहा तास वादळी चर्चा रंगली. शेवटी आयुक्त राजेश पाटलांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करू असं आश्वासन दिलं. दुसऱ्याच दिवशी पिंपरी पोलिसांकडे तक्रारी अर्ज दाखल केला. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. पोलिसांनी देखील तपासाची चक्र हलवली आणि तीन डॉक्टरांना बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे मोफत बेडवर उपचार मिळवण्यासाठी डॉक्टर लूट करत असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.. आता तरी ही लूट थांबेल आणि रुग्णांना मोफत सेवा मिळेल अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Embed widget