Pune News: पुण्यात सुरक्षिततेसाठी लावलेले हजारो CCTV कॅमेरे फक्त लटकवलेलेच; गुन्हेगारांना मिळतेय मोकळीक
Pune News: पुणे शहरात लावलेले सीसीटिव्ही कॅमेरे हे फक्त लटकवलेलेच दिसत आहेत, कारण शहरातील एकूण कॅमेऱ्यांपैकी जवळपास 1100 कॅमेरे बंद असल्याची माहिती आहे.
पुणे: मागील काही दिवसांमध्ये पुणे, मुंबईसह राज्यातून अनेक अत्याचाराच्या, खुनाच्या, हत्येच्या घटना समोर आल्या आहेत, या घटनांचा तपास करताना पोलिस प्रामुख्याने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज चेक करतात, मात्र परिसरातील सीसीटिव्हीचं बंद असतील तर, हो असाच काहीसा प्रकार पुणे शहरात दिसून येत आहे. पुणे शहरात तब्बल 1000 सीसीटिव्ही (CCTV camera) बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुण्यातील 25 पोलीस चौकींच्या हद्दीत हे सर्व सीसीटिव्ही कॅमेरे बंद (CCTV camera) असल्याचे निदर्शनास आले आहे. केबल तुटल्यामुळे बहुतांश हे कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात सुरेक्षाच्या आणि बाकी कारणास्तव 2 हजार 909 सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत मात्र, यातील 1054 सीसीटीव्ही (CCTV camera) बंद तर 1855 कॅमेरे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
गणेशोत्सवादरम्यान घडतात चोरीच्या मोठ्या घटना
गणेशाेत्सव काही दिवसांवर आला आहे, या काळात मोठी शहरात मोठी गर्दी होते. दुरवरून लोक गणेशोत्सव सोहळ्यासाठी पुण्यात येतात. या दरम्यान माेबाईल, सोनं, पाकीट अशा छोट्या मोठ्या चोऱ्या आणि गुन्हे होत राहतात. या पार्श्वभूमीवर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या दाव्यानुसार सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, त्याचे नियंत्रण पाेलिसांकडे आहे. त्यामुळे शहर परिसरात होण्याऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.
कोणत्या पोलिस चौकीतील सीसीटीव्ही बंद आणि किती आहे संख्या?
संभाजी पोलिस चौकी -30
नारायणपेठ - 27
शनिवार पेठ -35
खडक -39
सेनादत्त-34
मंडई -38
मीठगंज-13
पेरूगेट -26
सहकारनगर -24
महर्षीनगर - 71
मार्केटयार्ड - 42
वानवडी बाजार -21
घोरपडी- 9
विश्रांतवाडी - 7
समर्थ पोलिस ठाणे- 139
गाडीतळ- 18
कसबा पेठ -33
जनवाडी - 40
अलंकार - 8
कर्वेनगर - 71
डहाणूकर - 15
हॅपी कॉलनी - 6
ताडीवाला रस्ता- 70
कोंढवा - 49
अप्पर इंदिरानगर - 100
रामोशी गेट -2
काशेवाडी- 4
पेरुगेट -2
सहकारनगर - 5
सहकारनगर तळजाई-3
पर्वती दर्शन - 4
लक्ष्मीनगर - 4
वानवडी बाजार - 2
तुकाई दर्शन - 6
कोरेगाव पार्क -2
विश्रांतवाडी- 4
कसबा पेठ - 8
शिवाजीनगर पोलिस ठाणे- 4
शिवाजीनगर चौकी -5
पांडवनगर- 9
जनवाडी-4
कोथरूड पोलिस ठाणे -9
कर्वेनगर - 2