एक्स्प्लोर
ग्राहक न्यायालयाकडून बिल्डरला 3 वर्षांचा कारावास
पुणे : पुण्यातील बिल्डरला ग्राहक न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलीय. सर्रास दंडाची शिक्षा सुनावणाऱ्या ग्राहक न्यायालयाने चक्क कारावासाची शिक्षा सुनावण्याचं कदाचित हे पहिलंच उदाहरण असावं. एवढंच नाही तर दर महिन्याला १० हजार रूपये दंडही आकारला आहे.
ग्राहक न्यायालयाच्या आदेशाची अवमानना आणि सराईत पद्धतीने ग्राहकांना वेठीस धरण्यासाठी ग्राहक न्यायालयाने ही शिक्षा सुनावलीय. शिक्षा सुनावलेल्या बिल्डरला रू. 15 हजारांच्या जामीनावर मुक्त करण्यात आलंय, तसंच त्याला जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी एक महिन्याचा वेळही देण्यात आला आहे.
जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या व्ही पी उत्पात आणि क्षितीजा कुलकर्णी यांच्या बेंचपुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यांनी साईनाथ बिल्डर्सचे तुषार संपतलाल शाह यांना ही शिक्षा सुनावली. या निकालपत्रात बिल्डर कशापद्धतीने ग्राहकांची फसवणूक करतात आणि त्यांना कबूल केलेले तसंच वेळोवेळी दिलेली आश्वासने कसं पाळत नाहीत, याचं आदर्श उदाहरण असल्याचा निष्कर्षही न्यायाधीशद्वयींनी काढला आहे.
गृहनिर्माण सोसायटीचा पुनर्विकास करताना बिल्डरने दिलेली आश्वासने पाळली नाहीतच शिवाय नियमानुसार द्यावयाच्या फ्लॅट आणि दुकानाचा ताबा तब्बल 12 वर्षे प्रलंबित ठेवला. या दरम्यान सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईचाही हत्यार म्हणून वापर करत, न्यायालयात दिलेली आश्वासनांचीही संबंधित बिल्डरने अंमलबजावणी केली नाही, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.
सोसायटीचा पुनर्विकास करण्याचं मान्य केकेल्या साईनाथ बिल्डरच्या तुषार शहा यांनी तक्रारदार कृष्णा रामनाथ मल्ल्या यांना अनेक वर्षे न्यायालयीन लढाईत गुंतवून ठेवलं, त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या कायदेशीर वारसदारांना न्यायालयाचे खेटे घालायला लावले. आता मात्र अशा मग्रूर बिल्डरांना चांगलीच अद्दल घडलीय.
वेगवेगळ्या सोसायटीतील रहिवाशांना खोटी आश्वासने आणि प्रलोभने दाखवून त्यांच्या जागा ताब्यात घ्यायच्या आणि त्यातील रहिवाशांना वाऱ्यावर सोडून द्यायचं ही बिल्डरांची सराईत पद्धत असल्याचंही न्यायालयाने म्हटलंय. या प्रकरणात हीच पद्धत उघड झाल्याचंही निकालपत्रात स्पष्ट करण्यात आलंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement