एक्स्प्लोर
बेंच वाजवल्याने विद्यार्थ्याला चड्डीत लघुशंका करेपर्यंत मारहाण
जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार शनिवारी घडला.

पुणे: शाळेतील बेंच वाजवला म्हणून पहिलीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाने चड्डीत लघुशंका करेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. राजगुरुनगर इथल्या जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार शनिवारी घडला. मुलाचं वय सहा वर्षं आहे. कडलग गुरुजींनी त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.
बेंच वाजवला म्हणून शिक्षकाने संबंधित विद्यार्थ्याला हाताने मारहाण केली, त्याच्या पाठीवर अद्याप व्रण आहेत. ही मारहाण इतकी गंभीर होती की विद्यार्थ्याने चड्डीत लघुशंका केली.
याप्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून, आज गुरुजींची चौकशी केली जाणार आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
भारत
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement



















