एक्स्प्लोर

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा

98th Marathi Sahitya Sammelan : पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत अध्यक्षांची घोषणा झाली आहे. लोक संस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या तारा भवाळकर यांची निवड झाली आहे.

पुणे: दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत अध्यक्षांची घोषणा झाली आहे. लोक संस्कृतीच्या अभ्यासक असलेल्या तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. तारा भवाळकरांचं वय ८३ वर्षे इतकं आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी घोषणा केली आहे, या सहाव्या महिला अध्यक्ष आहे. ९८ वर्षात ६ महिला अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यातल्या सहाव्या डॉ. तारा भवाळकर आहेत तर पाचव्या अरुणा ढेरे होत्या.

 कोण आहेत डॉ. तारा भवाळकर 

डॉ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ मध्ये झाला. प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. निवृत्त झाल्यावर पुण्यातील ललित कला अकॅडमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकॅडमीमध्ये अतिथी प्राध्यापक देखील होत्या. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला विषयांचं लेखन आणि गाढा अभ्यास आहे. लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि स्त्री जाणिवांवर भाष्य करणारे लेखन त्यांनी केलं आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांचे योगदान आहे.

संमेलनाध्यक्षाची निवड करण्यासाठी आधी साहित्य महामंडळाने पुण्यात शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक घेतली होते. या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात झाली. त्यात महामंडळाचे पदाधिकारी तसेच साहित्य महामंडळाच्या घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तीन दिवसांचे कार्यक्रम, ग्रंथ दालन, ग्रंथ आदी विषयांवर चर्चा झाली. घटक संस्थांकडून साहित्य महामंडळाकडे प्राप्त झालेल्या नावावर चर्चा करून भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

पुस्तक 

तिसऱ्या बिंदूच्या शोधात
प्रियतमा
मरणात खरोखर जग जगते
मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे
मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद
यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा
लोकनागर रंगभूमी (माहितीपर)
लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा

डॉ.तारा भवाळकरांना मिळालेले पुरस्कार

- पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी पुरस्कार, १९८२

- बँक ऑफ बडोदा, सांगलीः कृतज्ञता पुरस्कार, १९९०

- महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार लोकसंचित ग्रंथासाठी, १९९२

- अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्लीः डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरववृत्ती, १९९४

- मंगल पुरस्कार, कोल्हापूर विशेष कर्तृत्ववान स्त्रीसाठी साहित्यिक क्षेत्रातील कार्यासाठी, १९९५

- श्री. ना. बनहट्टी पुरस्कार, पुणे नगर वाचन मंदिर, पुणे मराठी नाट्यपरंपरा शोध आणि अरस्वाद या ग्रंथासाठी, १९९६

- वि.म. गोखले पुरस्कार महाराष्ट्र साहितत्य परिषद, पुणे मराठी नाट्यपरंपरा शोध आणि आस्वाद या ग्रंथासाठी, १९९६

- विशेष वाङमय पुरस्कार वाडमय चर्चा मंडळ, बेळगाव माझिया जातीच्या या ग्रंथासाठी, १९९७

- वाङ्मय समीक्षा प्रथम पुरस्कार वाडमय चर्चा मंडळ, बेळगाव. मराठी नाटक नव्या दिशा नवी वळणे या ग्रंथासाठी, १९९८

- कै. मालतीबाई दांडेकर जीवनगौरव पुरस्कार साहित्यप्रेमी मंडळ, पुणे, २००४

- के. प्र. महिला गौरव पुरस्कार, २००५

- शिवलीला सांस्कृतिक कलामंच, सांगली महिला गौरव पुरस्कार, २००६

- विशाखा वतने पुरस्कार, नाट्यपंढरी लातूर. आकलन आणि आस्वाद या ग्रंथासाठी, २००६

- महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे जीवनगौरव पुरस्कार, २००६

- शरदचंद्र चट्टोपाध्याय पुरस्कारः म. सा. परिषद, पुणे, २००७

- लोकसंस्कृती, नाट्यसेवा पुरस्कार नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट, सांगली, २०१०

-  विशेष सन्मानवृत्ती महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, २०११

- डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान साहित्य सेवा पुरस्कार, सोलापूर, २०११

- सूर्योदय सेवारत्न पुरस्कार, जळगांव, २०१२

- ज्ञानेश प्रकाशन, पुणे पुरस्कृत शैलजा काळे स्मृती पुरस्कार, २०१३

- कै. डॉ. अ. का. प्रियोळकर स्मृती पुरस्कार मुंबई विद्यापीठ, २०१३

- रत्नशारदा पुरस्कार सह्याद्री वाहिनी दूरदर्शन, २०१५

- यशस्विनी पुरस्कार संवाद, वाई, २०१५

- साहित्य रत्न पुरस्कार रत्नाप्पाअण्णा कुंभार स्मृतीमंच, जयसिंगपूर, २०१६

- लोकमत सखीमंच जीवन गौरव पुरस्कार, सांगली, २०१६

- गार्गी पुरस्कार श्री. सिध्दिविनायक न्यास, मुंबई, २०१६

- सु.ल. गद्रे साहित्य पुरस्कार साहित्य संघ, मुंबई (मुलुंड), २०१६

- काकासाहेब खाडिलकर जीवन गौरव पुरस्कार अ.भा. मराठी नाट्य परिषद, सांगली, २०१७

- पद्मश्री विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार अहमदनगर, २०२१

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Ajit Pawar : राजकारणापलिकडचे संबंध, हीच तर आपली चांगली संस्कृतीYugendra Pawar on Sharad Pawar : ही भेट कौटुंबिक, कुटुंब एकत्र आलं पाहिजेAjit Pawar on Cabinet Expansion : बहुतेक 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार - अजित पवारAjit Pawar meet Sharad Pawar full Video : भेट घेतली, केक कापला, शरद पवार-अजित पवार भेटीचा  व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
नितीश राणा-आयुष बदोनी यांच्यात भरमैदानात वाद, अम्पायरची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Sushma Andhare: परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
Embed widget