एक्स्प्लोर

Tanmay Fadnavis Vaccination : तन्मय फडणवीसने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याचं माहिती अधिकारात उघड

दोन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसचा कोरोना लस घेतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळी देशात केवळ 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस घेण्याची अट होती. मात्र कमी वयाच्या तन्मयला कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाल्याने काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. आता माहिती अधिकारातून आणखी एक नवी बाब समोर आली आहे. तन्मय फडणवीसने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याचं उघड झालं आहे.

बारामती : तन्मय फडणवीसने आरोग्य कर्मचारी म्हणून कोरोनाची लस घेतल्याचं माहिती अधिकारात उघड झालं आहे. बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली होती. त्यात तन्मय फडणवीसने हेल्थ वर्कर म्हणून लस घेतल्याचं समोर आलं आहे. तन्मय फडणवीस हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू आहेत.

काही दिवसांपूर्वी तन्मय फडणवीसने कोरोनावरीस लस वयाच्या बंधनात बसत नसतानाही घेतली होती. लस घेतानाचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावरुन मोठा वादंग झाला होता. तन्मयचं ट्विटर अकाऊंट पाहिले तर त्याने अभिनेता असल्याचे नमूद केलं आहे. परंतु राज्य सरकारकडे लस घेत असताना आरोग्य कर्मचारी म्हणून त्याने उल्लेख केला असल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे.

Tanmay Fadnavis Vaccination प्रकरणावर देवेंद्र फडणवीस म्हणतात....

काय आहे प्रकरण?
एप्रिल महिन्यात देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसने त्याच्या ट्विटर हॅण्डलवर लसीकरणाचा एका फोटो शेअर केला होता. त्यावेळी देशात केवळ 45 वर्षांवरील नागरिकांनाचा कोरोना लस घेण्याची अट  होती. असं असताना फारच कमी वयाच्या तन्मयने नागपुरात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्याने लगेचच तो फोटो डिलीट केला. परंतु काँग्रेसने आपल्या ट्विटर हॅण्डलवर नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लस घेणाऱ्या तन्मयचा फोटो शेअर केला. "तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का? फ्रण्टलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी? भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का?" असे प्रश्न काँग्रेसने विचारले होते.

Tanmay Fadnavis Memes | 'चाचा विधायक है हमारे', ट्रोलर्सच्या निशाण्यावर तन्मय फडणवीस; 'ये फस गया' म्हणत अनेक मीम्स व्हायरल

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

"तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याने कोरोना लस कोणत्या निकषात घेतली, याची मला माहिती नाही. ती जर मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे असेल तर हरकत नाही. पण पात्रतेच्या निकषात नसेल, तर सर्वथा अयोग्य आहे. निकषात पात्र नसल्याने माझी पत्नी आणि मुलगी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. आज जरी 18 वर्षांपेक्षा सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी नियम सर्वांनीच पाळलेच पाहिजे, हे माझे ठाम मत आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

तर याच प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली होती. "कायदा सगळ्यांना समान आहे," असं अमृता फडणवीस म्हणाल्या. "कोणीही नियम आणि कायद्यापेक्षा मोठा नाही. कायद्याचा अवलंब करावा. आम्ही नेहमी कायद्याच्या बाजूने आहोत. या मुद्द्यावर आम्ही तुमच्यासोबत आहोत. याप्रकरणी कारवाई करावी, जेणेकरुन भविष्यात अशी कृती पुन्हा होणार नाही," असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

कोण आहे तन्मय फडणवीस?
तन्मय हा देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजीत फडणवीस यांचा मुलगा आहे. तन्मयने आपल्या ट्विटर हॅण्डलवर 'अॅक्टर' असं लिहिलं असून इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये 'पब्लिक फीगर' असा उल्लेख आहे. अभिजीत फडणवीस हे शोभा फडणवीस यांचे पुत्र आहेत. शोभा फडणवीस या माजी मंत्री देखील होत्या.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget