कोरोना महाराष्ट्रातून आऊट! ख्रिसमस -न्यू इयर धुमधडाक्यात साजरे करा : आरोग्य मंत्री तानाजी सावंत
Coronavirus Guidelines: कोरोना नियमांचं पालन करत ख्रिसमस, वर्षाअखेर आणि नवीन वर्षाचं धुमधडाक्यात साजरा करा, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.
Tanaji Sawant on Coronavirus Guidelines : कोरोनाला महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. आपल्याला धोका पत्कारायचा नाही, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. तुम्हीही कोरोना नियमांचं पालन करत ख्रिसमस, वर्षाअखेर आणि नवीन वर्षाचं धुमधडाक्यात साजरा करा, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.
बीएफ- 7 या सब व्हेरियंटचे रुग्ण महाराष्ट्रात नाही. ते येऊ नयेत म्हणून काळजी घेतली जात आहे. बीएफ- 7 या विषाणूचे चार रुग्ण भारतात आहेत. यापैकी गुजरात आणि ओडिसामध्ये प्रत्येकी दोन दोन रुग्ण आहेत. त्यामुळेच खबरदारी म्हणून कोरोना यंत्रणा पुन्हा सक्रिय केली जाणार आहे. 27 तारखाले आधीची यंत्रणा कशी होती, त्यासाठी मॉकड्रील ठेवलं आहे, असे आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले. तानाजी सावंत यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात पिंपरी चिंचवड येथं अटल महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
कोरोना संसर्गाच्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सक्षम असून नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, असंही आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितलं. प्रत्येक सण आणि सुट्यांचा आनंद घ्यावा, मात्र कोरोना नियमांचं पालन करा, असं आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं. ते म्हणाले की, सर्व रुग्णालय आणि मेडिकल सोयी-सुविधा अपग्रेड आहेत का? हे पडताळण्यासाठी 27 तारखेला मॉकड्रील घेण्यात येणार आहे. आपली यंत्रणा सक्षम आहे, त्यामुळे घारबरण्याचं कारण नाही. राज्यातील 95 टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे. तसेच राज्यातील बूस्टर डोसचं प्रमाण 60 ते 65 टक्के आहे. त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही, असे सावंत म्हणाले.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ
इतर देशांच्या तुलनेत भारतीयांची आणि महाराष्ट्रातील लोकांची रोग प्रतिकारक शक्ती जास्त आहे. काळजी करण्याचं कोणतेही कारण नाही. तरिही धोका पत्कारायचा नाही, म्हणून खबरदारी घेतली जात आहे, असे तानजी सावंत म्हणाले.
कोरोनाबाबत घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाशी लढण्यास महाराष्ट्र सज्ज असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. पाहा नेमकं ते काय म्हणाले?
32 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
आज राज्यात ३२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे. आज राज्यात 20 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८७,९४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.१७% एवढे झाले आहे.