एक्स्प्लोर

Tanaji Sawant Bodyguard : तानाजी सावंताच्या बॉडीगार्डची गोळ्यांनी भरलेली बंदूक कपाटातून खाली पडली, 13 वर्षाच्या मुलाच्या पायात गोळी घुसली

Tanaji Sawant Bodyguard home : मंत्री तानाजी सावंत यांच्या बॉडीगार्डने रिव्हॉल्व्हरमध्ये भरुन ठेवलेली बंदूक 13 वर्षीय मुलाच्या धक्क्याने खाली पडली आहे.

Tanaji Sawant Bodyguard home, Pune : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या धनकवडी येथील बंगल्यावर काम करणार्‍या सुरक्षा रक्षकाच्या घरी धक्कादायक घटना घडली आहे. सुरक्षा रक्षकाने रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन ते बॅगेत कपाटात ठेवले होते. मुलाचा धक्का लागून बॅग खाली पडली व गोळी सुटून 13 वर्षाच्या मुलाच्या पायाला लागून तो जबर जखमी झाला आहे. अभय शिर्के (वय 13) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन हनुमंत शिर्के (वय 40) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

कपाटातील रिव्हॉल्व्हर असलेली बॅग खाली पडून त्यातून गोळी सुटली

अधिकची माहिती अशी की, नितीन शिर्के हे मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडीतील बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे परवाना असलेली रिव्हॉल्व्हर आहे. त्यांनी आपल्या परवाना धारी रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन कसलीही खबरदारी न घेता रिव्हॉल्व्हर असलेली बॅग कपाटात ठेवली. त्यांचा मुलगा अभय शिर्के याने कपडे घालण्यासाठी कपाट उघडले. त्याने शर्ट घातला. त्यानंतर पँट घालत असताना धक्का लागून कपाटातील रिव्हॉल्व्हर असलेली बॅग खाली पडून त्यातून गोळी सुटली. ती अभय याच्या उजव्या पायाच्या पोटरीला लागून तो जबर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

इतर महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा, विधानसभाही लढणार आणि लोकसभेची पोटनिवडणूकही लढणार, मतदारसंघही ठरले!

Sangram Jagtap : गुंडगिरीच्या राजकारणाबाबत संग्राम जगताप यांचं रोखठोक भाष्य; म्हणाले, '...तर जनतेने तिसऱ्यांदा संधी दिली नसती'

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका

व्हिडीओ

Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Harshwardhan Sapkal : पुण्यात घमासान , पुण्यात भाजप वि.काँग्रेस संघर्ष पेटला
Ind vs Pak Live Update : पाकिस्तान संघाने जिंकली नाणेफेक, सूर्याचा मोठा निर्णय
Sharad Ponkshe on Muslim : प्लंबर असो वा सुतार, हिंदूच हवा, शरद पोंक्षेंचे वादळी विधान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
Ishan Kishan: संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
Embed widget