एक्स्प्लोर

Sushma Andhare: नारायण राणे म्हणाले, आमचा इतिहास माहीत नाही का? सुषमा अंधारेंनी इतिहासाची तीन पानं वाचून दाखवली!

Thackeray camp vs bjp rada: सुषमा अंधारेंनी नितेश राणेंचे जयदीप आपटेंसोबतचे फोटो दाखवले, सनातनसोबतचा संबंधही सांगितला. सुषमा अंधारे यांची नारायण राणेंवर जोरदार टीका. नितेश, निलेश राणे यांनाही डिवचलं.

पुणे: राजकोट किल्ल्यावर बुधवारी झालेल्या जोरदार राड्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार आगपाखड केली होती. राजकोट किल्ल्यावर वादाला आम्ही सुरुवात केली नाही, त्यांचे लोकच आमच्या अंगावर आले.आम्हाला काही करायचे असतं तर आम्ही चिरीमिरी करत नाही ओ, एकही पोहोचू शकला नसता घरापर्यंत. तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही का, असे वक्तव्य करत नारायण राणे यांनी विरोधकांना डिवचले होते. त्यांच्या या वक्तव्याचा गुरुवारी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला. सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर आजपर्यंतच्या कारकीर्दीत झालेल्या गंभीर आरोपांची जंत्री काढत त्यांचा इतिहास मांडला. त्या गुरुवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 

यावेळी सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नारायण राणे म्हणतात की, तुम्हाला माझा इतिहास माहिती नाही का? होय नारायण राव तुमचा इतिहास आम्हाला चांगला माहिती आहे. तुमचा इतिहास पोल्ट्री फार्म पासूनचा आम्हाला माहिती आहे. तुमचा इतिहास आम्हाला तिथंपासून माहिती आहे, 1990 ला जी कणकवली कधीकाळी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या समाजवादी विचारांनी भारावलेली होती त्या कणकवलीला गुन्हेगाराचा आखाडा करणे हे तुम्ही केले. राणे साहेब तुमचा इतिहास मला इतका पक्का माहिती आहे की, 1990 ला श्रीधर नाईकांची जी हत्या झाली त्या  हत्येचे तुम्ही मुख्य आरोपी होतात. तुमच्यावर खटला चालवला गेलाय तुमचा इतिहास इतका मोठा आहे की, 2002 ला सत्यजित भिसे चे जे कणकवलीत हत्या झाली त्याचाही आरोप तुमच्यावर होता. यावर देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर बोलले होते आणि न्यायालयात खटला चाललाय. 2009 ला राणेजी तुमचे स्वतःचे सखे चुलत भाऊ अंकुश राणे यांचा मृतदेह हा सिंधुदुर्गाला अत्यंत विकृत अवस्थेत मिळाला होता, हा तुमचा इतिहास आहे. तुमचा इतिहास हा आहे की, मुलुंडचा एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या याने अविघ्न पार्क मधला जो सगळा घोटाळा आहे तो घोटाळा काढून तुमच्या मागे ईडी लावली. नारायण राणे तुमचा इतिहास आम्हाला इतका माहिती आहे की, ज्या राहुल गांधीजींची तुम्ही आता जात काढताय त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राहुलजी यांच्या आई सोनिया गांधी यांच्या पायावर  मुजरे करायला तुम्ही सातत्याने दिल्लीच्या वाऱ्या करत होता हा तुमचा इतिहास मला माहिती आहे, अशी खोचक टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केली.

तुमचा इतिहास हा आहे की, तुम्हाला जेवणाच्या ताटावरून अटक करावी लागली. कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या सत्यजित भिसे असेल, श्रीधर नाईक असेल अंकुश राणे असतील अशा अनेकांना भरल्या ताटावरून उठवलेलं आहे, तुमचा इतिहास इतका मोठा आहे.  नारायण राणे  तुम्हाला भुंकल्याशिवाय कुठेही किंमत नाही. नारायण राणे आणि नितेश राणे आणि निलेश राणे तुम्हाला फक्त आणि फक्त शेवटी ब्रिगेड मध्ये ओरडण्यासाठीच देवेंद्रजींनी ठेवलेला आहे, ही तुमची एकूण पार्श्वभूमी आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.

आणखी वाचा

जयदीप आपटे RSS चा माणूस, त्यामुळे ब्राँझचा पुतळा बनवूनही डोक्याजवळ कागद आणि कापूस ठेवला, नाना पटोलेंचे गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Embed widget