Sushma Andhare On Lalit Patil : ससून रुग्णालयावरच 'ऑपरेशनची' वेळ ललित पाटीलचा एनकाऊंन्टर होऊ शकतो; सुषमा अंधारेंचा मोठा दावा
ललित पाटीलचा एनकाऊंटर होऊ शकतो, अशी शक्यता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. सोबतच ससून रुग्णालयावर ऑपरेशनची वेळ आली आहे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
पुणे : ललित पाटील प्रकरणात नवनवे खुलासे (Sasoon Hospital Drug Racket) समोर येत आहेत. त्यातच आता ससूनचे डीन ललित पाटीलवर त्यांच्यावर उपचार करत होते, हे समोर आलं आहे. त्यामुळे ललित पाटीलचा एनकाऊंटर होऊ शकतो, अशी शक्यता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. सोबतच ससून रुग्णालयावर ऑपरेशनची वेळ आली आहे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. संजीव ठाकूर यांनी नार्को टेस्ट करुन त्यांना सहआरोपी करा, अशी मागणीही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.
या प्रकरणावर बोलताना सुषमा अंधारे यांनी गृहखात्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाले की, जे काम गृहखात्याने करायला हवं, मात्र ते काम पत्रकार करत आहेत. आम्ही सातत्याने याबाबत बोलत होतो. ससूनचे डीन संजीव ठाकूर ललित पाटीलवर उपचार करत होते .ससूनच्या डीनची नार्को टेस्ट करा. ससूनच्या डीनवर कुणाचा वरदहस्त आहे. हे लगेच कळेल. संजीव ठाकूर यांना सहआरोपी करण्यात यावे. त्यांनी बोगस उपचार केले. हर्नियाच्या ऑपरेशनला 5 महिने लागता मात्र एवढे 9 महिने कशासाठी ससूनमध्ये ठेवण्यात आलं?, संजीव ठाकूरवर फार मोठा राजकीय वरदहस्त आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, संजीव ठाकूर एक खोटं बोलण्यासाठी 100 खोटं बोलत आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या. शिवाय ललित पाटील हा शिवसेनेत काम करत होता. त्यावर त्यांना विचारलं असता. तो कुठल्या पक्षात होता, त्यामुळे त्याचा गुन्हा माफ होत नाही. तो जेलमध्ये होता. त्या जेलच्या कारागृह अधीक्षक होते ते नेमकं काय करत होते, असाही प्रश्न त्यांनी कारागृह प्रशासनाला विचारला आहे.
उपचाराच्या नोंदी असलेलं रजिस्टर संजीव ठाकूर यांनी लपवलं; धंगेकर
उपचाराच्या नोंदी असलेलं रजिस्टर संजीव ठाकूर यांनी लपवलं आणि त्याच्यावर बोगस उपचार करत होते, असा आरोप आमदार रविंद्र धंगेकर यांनी संजीव ठाकूर यांच्यावर केले आहेत. ललित पाटीलला संजीव ठाकूरने तातडीने हर्नियाची शस्त्रक्रिया सांगितली होती. मात्र, त्यानंतर त्याने पळ काढला. शिवाय तातडीने शस्त्रक्रिया सांगितल्यावर 10 दिवस वेगवेगळ्या शहरात तो फिरत कसा होता?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणात संजीव ठाकूर यांना मंत्र्याचा पाठिंबा आहे. त्याशिवाय एवढी हिम्मत होत नाही. त्यांच्यावर बोगस उपचार सुरु होते आणि ससूनमध्ये ललित हा फक्त ड्रग्ज रॅकेट चालवण्यासाठी भरती होता, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यासोबतच गुन्हेगारांसोबत वावर असलेल्या मंत्र्याचा या प्रकरणात हात आहे. एवढंच नाही तर पोलीस आणि ससूनच्या बाकी अधिकाऱ्यांचादेखील पाठिंबा असल्याचं धंगेकरांनी स्पष्ट केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या-