(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supriya Sule : आपण आपला खेळ कॅप्टन कूल धोनीसारखा खेळायचा, सुप्रिया सुळे यांचं सूचक वक्तव्य
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे.
बारामती : निवडणुकांचे अनेक सर्वे येत असतात. त्यामुळे जास्त आनंदी व्हायचं नाही आणि दु:खी व्हायचं नाही. आपण आपला खेळ शांतपणे खेळायचा असतो, कॅप्टन कूल धोनीसारखा, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलंय. सध्या राज्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election) वारे वाहतायत. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या भुवया उंचावल्या असल्याचं पाहायला मिळंत आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी बच्चू कडू आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यावर देखील सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. यावर बोलताना त्यांनी म्हटलं, जर ती चर्चा बंददाराआड झाली असेल तर ते मला कसं कळेल. अपात्रतेचा निर्णय काय होईल त्यावर पुढची भूमिक ठरवू, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
पंतप्रधान नाशिकमध्ये आल्यावर शेतकऱ्यांचं दुःख त्यांच्यापर्यत पोहोचेल - सुप्रिया सुळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशि दौऱ्यावर येणार आहेत, यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, अतिथी देवो भव. त्यांचे नाशिकमध्ये स्वागत आहे. नाशिकमध्ये आल्यावर शेतकऱ्यांचे कांद्याचे दुःख त्यांच्यापर्यत पोहोचेल. त्यांनी निर्यात बंदीवर चुकीचा निर्णय घेतला त्यावर फेरविचार करावा अशी मागणी देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी केलीये.
या दडपशाही विरोधात लढत राहू - सुप्रिया सुळे
नागपुरात काँग्रेसच्या हे तयार हम या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी आम्ही सभा घ्यायच्या की नाही, असा सवाल उपस्थित केलाय. आमच्या सभेला परवानगी द्यायला खूप त्रास झाला.या दडपशाही विरोधात लढत राहू, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
राम हा आस्थेचा विषय - सुप्रिया सुळे
अवघ्या काहीच दिवसांत अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात तयारी सुरु करण्यात आलीये. यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, राम हा आस्थेचा विषय आहे. जगात त्यांचे भक्त आहेत. आपण राम कृष्ण हरी वाले आहोत.
दरम्यान शेतकऱ्यांवर जोपर्यंत अन्याय होत असेल, तोपर्यंत त्या विरोधात आम्ही ताकदीने लढणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून त्यांना जागे करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.