एक्स्प्लोर

Supriya Sule on Ajit Pawar : 'मी पवारांच्या पोटी जन्माला आलो असतो तर...' अजितदादांच्या वक्तव्यावर सुप्रियांचा जोरदार पलटवार

शिरुरमधील महाविकास आघडीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांनी प्रचार सभा घेतली. सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले. 

Supriya Sule on Ajit Pawar : आजवर आपल्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होत आलेत, पण आता आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत नाहीत. डंके की चोट पर मी सांगते आता आमच्यावर बोलून दाखवा, पण मी अशोक चव्हाणांची बाजू घेऊन तोंडावर पडले. आजवर भाजप त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले अन चव्हाणांनी अचानक भाजपवासी झाले. सहा वर्षाची राज्यसभा त्यांना मिळाली. इथं मी आणि अमोल कोल्हे खासदार होण्यासाठी वणवण भिंगरी लावून फिरतोय, अन ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांना आयती खासदारकी मिळाली, अशा खोचक शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. 

शिरुरमधील महाविकास आघडीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांनी प्रचार सभा घेतली. सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले. 

मंत्री पद महत्वाचं की निष्ठा महत्वाची? पुत्री प्रेमाचा पण आरोप केला गेला

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपला पक्ष फुटला, चोरला, वगैरे वगैरे सुरू आहे, पण मी आज तेच म्हणते, प्यार से मांगा होता ना सबकुछ दे देते. नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला ताकद लागते. मंत्री पद महत्वाचं की निष्ठा महत्वाची? हे तुम्हीच सांगा, अशी विचारणा करत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांनी केलेल्या मी त्यांच्या पोटी जन्माला आलो असतो वक्तव्यावर पलटवार केला आहे. त्यांनी सांगितले की, आता मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. तुम्हीच तुलना करा ना? कोणाला काय मिळालं याचा हिशोब करा. मला काय मिळालं आणि दादांना काय काय मिळालं. सगळं तुमच्या समोर आहे. सगळं स्पष्ट होईल. खूप सोप्प उत्तर आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शिरूर लोकसभेचा आपला उमेदवार एक नंबरचा आहे. अमोल दादा माझ्या भावासारखा आहे. आपल्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, पण आता आपण मुक्त झालो आहोत. पुत्री प्रेमाचा पण आरोप केला गेला, असेही त्या म्हणाल्या. 

अगं बया, मी तर घाबरलेच.

सुळे पुढे म्हणाल्या की, आपले विरोधी उमेदवार म्हणत आहेत, ही माझी शेवटची निवडणूक आहे. मला निवडून द्या. अगं बया, मी तर घाबरलेच, असे म्हणत त्यांनी टोला लगावला. त्यांनी सांगितले की, म्हणजे पुढील पाच वर्षे काम करणार नाहीत. वर्ष मोजत राहतील. मला तर आधी वाटलं होतं, की विरोधी उमेदवार शिवाजी आढळराव माझ्या वडिलांच्या वयाचे असतील. पण मगाशी मला समजलंकी अजित दादा, दिलीप वळसे आणि उमेदवार एकाच वयाचे आहेत, पण त्यांचा आदर करायला हवा. मात्र, ते म्हणतात माझी शेवटची निवडणूक आहे. ऐकून वाईट वाटलं. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार, असेही त्या म्हणाल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
Chakan MIDC Pune News: चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget