Supriya Sule : पुण्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुप्रिया सुळेंनी फेसबुक लाईव्ह करत सरकारकडे केली 'ही' विनंती
पीएमटी बससेवा बंद केल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे सरकारने ही बससेवा सुरु करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
Supriya Sule On Pmpml : पुणे जिल्ह्यातील (Pmpml) ग्रामीण भागातील पीएमटी बससेवा प्रशासनाकडून बंद केली आहे. ही बससेवा बंद केल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे प्रशासनानं ही बससेवा सुरु करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी केली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनीही मागणी सरकारकडे मागणी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाखो मुलं पुण्यात शिक्षणासाठी येत असतात. त्यातील अनेक मुलं रोज खिशाला परवडणाऱ्या पीएमटीने प्रवास करतात. मात्र पीएमटी बंद केल्याने या विद्यार्थांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनादेखील शिक्षणाचा समान अधिकार आहे. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीततरी राजकारण करु नका, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
पुरंदर, वेल्हा, मुळशी, खडकवासला, दौंड या भागातील पीएमटी बस सुरु करण्यात आली होती. आजपर्यंत अनेक वर्ष ही बससेवा सुरु होती. अजित पवार पालकमंत्री असताना दौंड आणि पुरंदरचे बसचे मार्ग वाढवून घेतले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोठी सोय पीएमटीने करुन दिली होती. पीएमटीचे सगळे मार्ग बंद केले हे दुर्दैव आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पीएमटी बसने खर्च करु नये, हे दुर्दैवी आहे. या बसचा अतिशय कमी खर्च आहे. या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातील पीएमटीसेवा सुरु करावी, अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे. पण पायाभूत सुविधा, रस्ते, मेट्रो यासाठी ज्याप्रमाणे निधी दिला जातो मग विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी निधी का दिला जावू शकत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
'या' 11 मार्गावर बससेवा बंद
ग्रामीण भागातील 11 मार्गावरील पीएमपीएलची सेवा होणार बंद होणार करण्यात आली आहे. दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होत आहे. 1) स्वारगेट ते काशिंगगाव, 2) स्वारगेट ते बेलावडे, 3) कापूरहोळ ते सासवड, 4) कात्रज ते विंझर, 5) सासवड ते उरुळी कांचन, 6) हडपसर ते मोरगाव, 7) हडपसर ते जेजुरी, 8) मार्केटयार्ड ते खारावडे, 9) वाघोली ते राहूगाव, पारगाव, 10) चाकण ते शिक्रापूर फाटा,11) सासवड ते यवत या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळं ग्रामीण भागातील प्रवाशांचा खोळंबा होत आहे.
ईडी सरकारने यात राजकारण करु नये; सुप्रिया सुळे
विद्यार्थ्यांसोबतच नोकरी करणारा कर्मचारी वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाचे देखील मोठे हाल होत आहे. ईडी सरकारला या सगळ्यांचे हाल दिसत नाही आहे. ते प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे. ही बससेवा सुरु करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.