एक्स्प्लोर

Supriya Sule : 'एकवेळ माणूस उपाशी राहिला तरीही चालेल मात्र फोटो पाहिजे'; आनंदाच्या शिधा वाटपावरुन सुप्रिया सुळेंची खोचक टीका

Anandacha Siddha : शिधा पिशव्यांवर पाहिजे असणारे फोटो हे महत्वाचे आहेत. एकवेळ माणूस उपाशी राहिला तरीही चालेल मात्र फोटो लागला पाहिजे, अशी खोचक टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Supriya Sule on  Anandacha Siddha :  राज्य सरकारचं दिवाळी गिफ्ट (Anandachi Shidha) अजून अनेक गावात पोहोचलं नाही आहे. आनंदाच्या शिधा पिशव्यांवर पाहिजे असणारे फोटो हे महत्वाचे आहेत. एकवेळ माणूस उपाशी राहिला तरीही चालेल मात्र फोटो लागला पाहिजे, अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी केली आहे. त्या पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्ये बोलत होत्या. राज्य सरकारने सर्व सामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी 100 रुपयांमध्ये शिधा वाटपाची योजना आखली होती मात्र दिवाळी तोंडावर आली तरीही शिधा अजून काही ठिकाणी पोहचला नाही त्यावरुन सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, असे उपक्रम जबाबदारीने राबवा. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा हा कॅज्युअल अप्रोच आहे. काहीतरी घाईघाईत अर्धवट करण्याचा प्रयत्न केला आहे.  गरीबांसाठी जे कराल ते मनापासून करा. फोटो मध्ये अडकू नका, अशी माझी विनंती आहे. सेवा ही महत्त्वाची असते. फोटो हा महत्त्वाचा नसतो, असाही टोला सुप्रिया सुळे यांनी यावेळी लगावला. केंद्र आणि राज्य सरकारला सर्वसामन्यांचे घेणं-देणं नाही. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोपही यावेळी त्यांनी केला. 

'सरसकट कर्जमाफी द्या'
पुरंदर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्या पावसामुळे शेतीचे नुकसान झालं. पांगारे गावात सुप्रिया सुळेंनी शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. राऊतवाडी या ठिकाणी हरणी ते मुरती या रस्त्याचे भूमिपूजन केलं. गेल्या काही दिवसांत पाऊस झाला. यावेळी त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच सरसकट कर्ज माफी करावी, अशी मागणी केली.  शेतकऱ्यांच्या बांधावर कुणीही जात नाही. शेतकरी किती अडचणीत आहेत, हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यावर कळेल.  महाराष्ट्र सरकारने हा विषय गंभीरपणे घेण्याची गरज आहे. सरकारी यंत्रणेने ऑफिसमध्ये न बसता बांधावर गेले पाहिजे. शेतकऱ्यांना तातडीने मदत झाली पाहिजे, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. 

लोकसभेआधी विधानसभा होणार-
आपण उद्धव ठाकरेंची शिवसेना, असं म्हणायचं नाही. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष सुरू केला. त्यांनी त्यांच्या उत्तराधिकारी नेमला. काँग्रेस आणि आम्ही वेगळं आहोत. आम्ही कधी म्हणतो का सोनिया गांधी आमची मावशी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतभेद झाले पण मन भेद कधीच झाले नाहीत. ज्या पद्धतीने राज्यात राजकारण सुरू आहे. त्यानुसार लोकसभेआधीच विधानसभा निवडणूक लागेल अस वाटत, असेही त्या म्हणाल्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget