एक्स्प्लोर

Sunil Shelke: 'अजितदादांच्या समोरच शेळकेंना अश्रू अनावर...', सुनील तटकरेंनी सुनील शेळकेंची थोपटली पाठ अन्, नेमकं काय घडलं?

Sunil Shelke: प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) पुढं येत, शेळकेंची पाठ थोपटली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Sunil Shelke: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पक्ष तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) (NCP) पक्षाने राज्यभरात जनसंवाद यात्रा काढण्यास सुरूवात केली आहे. आज ही जनसंवाद यात्रा मावळमध्ये आहे. मावळ मतदारसंघात जनसंवाद यात्रेच्या सभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदारांचे आभार मानत ती गेल्या निवडणुकीवेळी जशी पाठिशी उभी राहिली तशी आताही राहिल असा विश्वास व्यक्त केला. त्यावेळी सुनील शेळकेंना (Sunil Shelke) अश्रू अनावर झाले. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) पुढं येत, शेळकेंची पाठ थोपटली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

नागरिकांनी दिलेली साथ मी कधी विसरणार नाही

गेल्या निवडणुकीवेळी तुम्ही जी साथ दिली त्यासाठी कायम तुमचं काम करत राहिलं. नागरिकांनी दिलेली साथ मी कधी विसरणार नाही असं म्हणत ते भावूक झाले त्यानंतर उपस्थितांनी घोषणा द्यायला सुरूवात केली. यावेळी ते म्हणाले, मायबाप जनता माझं सर्वस्व आहे, मला पैशांची भूक नाही, मी पैशासाठी किंवा पदासाठी राजकारणात काम करत नाही. कोणत्या मान सन्मानाची देखील मला आवश्कता नाही. परंतु ज्या मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला. याच विश्वासाने आयुष्यभर मी तुमच्याशी प्रामाणिक राहिन, याच विश्वासाने मी तुमची सेवा करेन. उद्या निवडणुका होतील जे व्हायचं ते होऊ द्या परंतु पद प्रतिष्ठा महत्त्वाची नसते हे मला माहिती आहे, असंही पुढे शेळके (Sunil Shelke) म्हणाले आहेत. 

मला मतदान देण्यासाठी बच्चा-कच्चानी शपथा घ्यायला लावल्या तो दिवस आजही मला आठवतो. काही मंडळी आरोप करतात, टीका करतात. मला आरोपाचं वाईट वाटत नाही, माझा बाप कष्ट करतो, माझा भाऊ कष्ट करतो, माझी बायको सावलीसारखी उभी आहे, ज्या दिवशी सुनिल शेळके तुमचे पैसे घेईल त्या दिवशी तुमची दार बंद होतील, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे, तोवर माझ्यासोबत राहा असंही शेळके (Sunil Shelke) यावेळी म्हणाले आहेत. 

 सुनील तटकरेंनी सुनील शेळकेंच्या भाषणावेळी पाठ थोपटली

गेल्या निवडणुकीत मला मतदान देण्यासाठी तुम्ही जे जे केलं, ते मी कधीचं विसरू शकत नाही, असं म्हणत असताना शेळकेंना अश्रू अनावर झाले. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पुढं येत, शेळकेंची पाठ थोपटली, मी तुमच्याशी प्रामाणिक आहे तोवर कायम माझ्यासोबत राहा असंही यावेळी सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी म्हटलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Embed widget