Sunetra Pawar : अजित पवारांनी फोडला सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ; कन्हेरीचा मारोती पावणार का?
Sunetra Pawar : अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. कन्हेरीच्या मारोती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे.
बारामती : सुप्रिया सुळे (Supriya Sule) काल यांच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर आज सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. 1967 पासून आतापर्यंत पवार कुटुंबीयातला कुठलाही सदस्य निवडणुकीला रिंगणात उतरला की त्याचा प्रचाराचा शुभारंभ होतो बारामती तालुक्यातील कन्हेरी इथल्या मारुती मंदिरातून होतो. काल सुप्रिया सुळेच्या प्रचाराचा नारळ याच कन्हेरीच्या मंदिरातून फुटला आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ कन्हेरी मंदिरातून सकाळी अजित पवाराच्या उपस्थितीत फोडला आहे. आजपर्यंत कन्हेरीचा मारुतीराया हा पवारांना पावत आला आहे. आता हा मारोतराया नेमका कुणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
आज सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी अजित पवारांचा मुलगा जय पवार आणि अजित पवारांचे कार्यकर्ते उपस्थित होते. बारामती लोकसभा मतदार संघाकडे राज्याच्या प्रमुख नेत्यांंच लक्ष लागलं आहे. त्यातच अजित पवारांनी आणि सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यानंतर आज अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ केला.
पवार विरुद्ध पवार?
बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत आहे. एकीकडे सुप्रिया सुळे तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आहेत. त्यातच काल सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला त्यावेळी संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. संपूर्ण पवार कुटुंबीय अजित पवारांना विरोधात असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मात्र अजित पवार आणि त्यांच्या मुलगा जय पवार उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार एकटे पडलेत का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कन्हेरीचा मारोती कोणाला पावणार?
पवार कुटुंबाचं आणि कन्हेरीच्या मारोतीचं जवळचं नातं असल्यासारखं आहे. संपूर्ण पवार कुटुंबाची श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक शुभ कार्याच्यावेळी पवार कुटुंबीय कन्हेरीच्या मारोतीचं दर्शन घेतं. यावेळी पवार कुटुंबीय जरी वेगळे झाले असतील तरीही दोन्ही कुटुंबीयांनी कन्हेरीच्या मारोतीचं दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे. मात्र दोन्ही पवारांपैकी कोणत्या पवार कुटुंबियांना मारोती पावणार?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाची बातमी-