एक्स्प्लोर
पिंपरीमध्ये नैराश्यातून तरुण दाम्पत्याची आत्महत्या
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये एका दाम्पत्यानं काल आत्महत्या केली आहे. काल रविवारी ही घटना घडली आहे. अनिकेत ढमाले (25) आणि अश्विनी ढमाले (वय 22) असं दाम्पत्याचं नाव असून नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पिंपरी चिंचवडमधील दाम्पत्याने कुटुंबिय घराबाहेर गेले असताना आत्महत्या केली आहे. आधी पत्नीने आत्महत्या केली असावी आणि त्यानंतर कारवाईचा ससेमिरा पाठीशी लागेल या भीतीनं पतीनंही आत्महत्या केली असेल असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून लावण्यात येत आहे.
अनिकेत हा मेकेनिकल इंजिनिअर होता, तो एका चॉकलेट बनवणाऱ्या खाजगी कंपनीत कामाला होता तर अश्विनीचे बी कॉम झाले होते आणि ती गृहिणी होती. या दोघांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन तपास सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement