एक्स्प्लोर
Advertisement
पुणे विद्यापीठात सुरक्षारक्षकांसमोर मारामारी, नवा व्हिडिओ समोर
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सध्या विद्यार्थी संघटनांच्या वादामुळे आखाडा बनलं आहे. कारण, एसएफआय आणि अभाविपच्या मारहाणीचा नवा व्हिडिओ आता समोर आलाय. ज्यात अर्वाच्य शिवीगाळ आणि मारहाण केल्याचं दिसत आहे.
मारहाणीचा सर्व प्रकार घडत असताना विद्यीपीठाचे सुरक्षारक्षक मात्र बघ्याच्या भूमिकेत होते. सुरक्षारक्षकांकडून विद्यार्थ्यांना पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वाद वाढतच गेला, त्यामुळे सुरक्षारक्षकांनी अंग काढून घेण्याचा प्रयत्न केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. याप्रकरणी विद्यापीठाकडून अद्याप कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही.
काय आहे प्रकरण?
सैनिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारकांच्या निषेधार्थ 27 तारखेला मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी एफएसआयच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात पोस्टर्स लावले होते. त्या पोस्टर्सवर भाजपचा उल्लेख असल्यामुळं अभाविपने आक्षेप घेतला आणि दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान, याप्रकरणी परस्पर गुन्हे दाखल झाले असून 9 विद्यार्थी अटकेत आहेत.
पाहा व्हिडिओ :
संबंधित बातम्या :
वादग्रस्त पोस्टरवरुन एसएफआय आणि एबीव्हीपीमध्ये वाद, 9 जण ताब्यात
पुणे विद्यापीठात अभाविप आणि एसएफआयच्या विद्यार्थ्यांचा राडा, 9 विद्यार्थी ताब्यात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement