एक्स्प्लोर

Rupali Chakankar: निवडणुकीनंतर अडगळीत पडलेल्या महिला माझ्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागतायत, रुपाली चाकणकरांचं विरोधकांना प्रत्युत्तर

Rupali Chakankar news: वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणामुळे रुपाली चाकणकर सध्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला जात आहे.

Rupali Chakankar: वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणावरुन राज्य महिला आयोगाला विरोधकांकडून सातत्याने लक्ष्य केले जात आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधकांना प्रत्युत्तर दिले. माझ्या प्रदेशाध्यक्ष पद आणि महिला आयोगाचे अध्यक्षपद याबाबत महाविकास आघाडीवाले टीका करत आहेत. त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, मला महिला आयोगाचे (Mahila Ayog) अध्यक्षपद हे महाविकास आघाडी सरकार असताना मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी नेमकं ठरवाव त्यांना काय बोलायचं आहे ते. या आधी ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या त्या देखील एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा होत्या. सध्या माझ्यावर टीका करणाऱ्यांमध्ये कोण आहे तर, ज्या महिला निवडणुकीनंतर बाजूला पडल्या आहेत, त्यांना कोणी विचारत नाही. त्या सध्या माझ्यावर टीका करत आहेत कारण त्यांना माहिती आहे आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले. (State Women Commission)

आज जे शिष्टमंडळ राजीनामा मागणीसाठी गेले आहे, ते केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी गेले आहेत. फुके प्रकरणातील महिलेचे पत्र मला मिळाले नाही. आमच्याकडे टपालच्या माध्यमातून तक्रार घेण्याची सोय आहे. आयोगाचा नंबर बंद आहे ही चुकीची बातमी आहे. आयोगाची फोनसेवा कार्यालयीन वेळेत सुरु असते. आयोगाची गरिमा मोठी आहे. त्यांचा काही सूचना असतील तर मला पाठवाव्यात. फक्त प्रसिद्धीसाठी टीका करू नये. मी राज्य महिला आयोगाची आठवी अध्यक्ष आहे. या आधी देखील ज्या अध्यक्षा होत्या, त्या पक्षाच्या अध्यक्षा होत्या, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

 State Women Commission: राजभवनात प्रवेश न मिळाल्यामुळे काँग्रेसच्या संगीता तिवारी नाराज, सुषमा अंधारे-पेडणेकरांना म्हणाल्या...

राज्य महिला आयोगाच्या कारभाराबाबत तक्रार करण्यासाठी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचे शिष्टमंडळ मंगळवारी राज्यपालांकडे गेले होते. यावेळी मविआच्या शिष्टमंडळातील काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांना राजभवनात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे संगीता तिवारी चांगल्याच संतापल्या. काँग्रेसला शिष्टमंडळामधून बाजूला केले हे तुम्ही म्हणताय. आता  इतर पक्षाच्या दोन दोन नेत्या जात असतील तर काँग्रेसच्या सुद्धा दोन नेत्या जायला काही हरकत नव्हती. मला रोहिणी खडसे यांनी सांगितले की, तुम्हाला यायचं आहे म्हणून मी पुण्याहून एवढे लांब आले, नाही तर मी कशाला आले असते?

काँग्रेसला शिष्टमंडळामधून बाजूला केले हे तुम्ही म्हणताय. आता  इतर पक्षाच्या दोन दोन नेत्या जात असतील तर काँग्रेसच्या सुद्धा दोन नेत्या जायला काही हरकत नव्हती. इथे आल्यानंतर परवानगी दिली नाही, शिवाय आम्ही आतंकवादी असल्यासारखं वागवलं. सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर या दोन नेत्या एकाच पक्षाच्या गेल्या. त्या दोघी गेल्या मला विचारलं नाही. त्यावर माझी नाराजी नाही. मी नाराजी का व्यक्त करू ? बोलून सुद्धा मला  राजभवनामध्ये आतमध्ये घेतलं नाही, मी परत आतमध्ये गेलेल्या नेत्यांना कॉल लावूव डिस्टर्ब कशाला करू. त्यामुळे आता मी पुण्याला माघारी जात आहे, असे संगाती तिवारी यांनी म्हटले.

आणखी वाचा

मॉर्डन महिला अध्यक्षांना जबाबदारीतून पळता येणार नाही, रुपाली चाकणकरांवर रोहिणी खडसेंचा हल्ला; म्हणाल्या, हा तर ईमेल वाला महिला आयोग

महत्त्वाच्या बातम्या

Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Nitin Gadkari : मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!
मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!

व्हिडीओ

Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget