एक्स्प्लोर

Rohini Khadse on Rupali Chakankar : मॉर्डन महिला अध्यक्षांना जबाबदारीतून पळता येणार नाही, रुपाली चाकणकरांवर रोहिणी खडसेंचा हल्ला; म्हणाल्या, हा तर ईमेल वाला महिला आयोग

Rohini Khadse on Rupali Chakankar : आजची विधानभवन मधील बैठक म्हणजे उशिरा सुचलेले शहापण आहे. आधी बैठका घेतल्या असत्या तर वैष्णवी हगवणेचा जीव वाचला असता, असेही रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.

Rohini Khadse on Rupali Chakankar : विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या अध्यक्षतेखाली आज महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्वे आणि अडचणींचा आढावा घेण्यासंदर्भात विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. विधान भवनात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर (Vaishnavi Hagawane Case) महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. याविषयी आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. मात्र आयोगावर याआधी काम केलेल्या अनेक माजी सदस्यांना या बैठकीचे निमंत्रण न  मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

रोहिणी खडसे म्हणाल्या की, आजची विधानभवन मधील बैठक म्हणजे उशिरा सुचलेले शहापण आहे. आधी बैठका घेतल्या असत्या तर वैष्णवी हगवणेचा जीव वाचला असता. आज महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आम्ही मागतोय म्हणून यांना आता बैठका घेण्याचं सुचलं आहे. बैठका घेण्याचा दिखावा बंद करा. सध्या आयोग व्यक्तीकेंद्रित आहेत म्हणून 7 सदस्य यांनी भरले नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. 

खेड्यापाड्यात राहणाऱ्या महिला मेलवर तक्रारी कशा करणार?

रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, त्या म्हणतात हुंडा बळीच्या झिरो पेंडण्सी आहे. या मॉडर्न महिलाध्यक्षा आहेत. केवळ आलेल्या मेलला पोलीस स्टेशनला फॉरवर्ड करणे हे त्यांचं काम आहे का? पोस्टाने ज्या तक्रारी येतात त्याची दखल या घेत नाहीत का? प्रिया फुके यांनी एक वर्षापूर्वी पोस्टाने तक्रार केली आणि या म्हणतात प्रिया फुकेची तक्रार आमच्याकडे आली नाही. खेड्यापाड्यात राहणाऱ्या महिला मेलवर कशा तक्रारी करणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.  

चाकणकरांनी तत्काळ राजीनामा द्यावा 

आयोगाच्या अध्यक्षांनी दिखावा करून काम केलं नसतं वेगळं चित्र पाहिला मिळालं असतं. पाच ते सहा महिने या आयोगाच्या बैठका देखील घेत नाहीत. त्यांना एकावेळी दोन जबाबदाऱ्या झेपत नाहीत. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. कारण त्यांचा सगळा वेळ पक्षाचे काम करण्यात जातो, अशी टीका रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केली आहे. 

आणखी वाचा 

State Women Commission: महिलांबाबतची धोरणं ठरवण्याची अक्कल फक्त पुणे-मुंबईच्या लोकांना आहे का? विदर्भाला प्रतिनिधित्व न मिळाल्याने नीलम गोऱ्हेंवर आगपाखड

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget