एक्स्प्लोर

Pune News : कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत 'जरा धीरे चलो'; जड वाहनांना नवी वेगमर्यादा अन्यथा...

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान जड वाहनांना आता नवीन वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याठिकाणी नियमांचं उल्लंघन केल्यास चालकावर कडक कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून  सांगण्यात आलं आहे.

 Pune News : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर  कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान जड वाहनांना आता नवीन वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याठिकाणी नियमांचं उल्लंघन केल्यास चालकावर कडक कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यात अपघातांचा हॉटस्पॉट ठरलेल्या नवले पुलावर आता अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान जड वाहनांसाठी वेगमर्यादा प्रति तास 60 किलोमीटरवरुन प्रति तास 40 किलोमीटर इतकी घटवण्याची सूचना काढण्यात येणार आहे. तसंच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सरासरी 300 वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.

या ठिकाणी असलेले काही हॉटेलचालक आणि अन्य व्यावसायिक मुख्य मार्ग आणि सेवा रस्ता यामधील डिव्हायडर तोडत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्या व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने सुचवण्यात आलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांनी या सूचना केल्या आहेत. 

जड वाहनांची वेगमर्यादा 40 किमी प्रतितास करणार

कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान अपघात टाळण्याच्या अनुषंगाने जड वाहनांसाठी वेगमर्यादा 60 किमीवरुन 40 किमी प्रतितास इतकी घटवण्याची अधिसूचना तात्काळ काढण्याचे निश्चित करण्यात आले. खेड शिवापूर पथकर प्लाझा येथे सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी सतत उद्घोषणा करण्यात यावी, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. या रस्त्यावर ब्रेक निकामी झालेल्या वाहनांना रस्त्यावरुन बाजूला जाण्यासाठी इमर्जन्सी एस्केप प्लॅनअंतर्गत बाहेर पडण्याचे ठिकाण (एक्झिट रॅम्प) तयार करण्याबाबत पाहणी केली जाणार आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृती

सर्व शासकीय कार्यालयात दुचाकीने येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी परिवहन विभाग तसेच पोलिसांनी संयुक्तपणे जनजागृती करावी. 'एक दिवस डोक्यासाठी' अशा स्वरुपाची मोहीम राबवत हेल्मेट न वापरणाऱ्यांचे प्रबोधन तसेच दंडात्मक कारवाई करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. हेल्मेटचे महत्व पटवून देण्यासाठी मास्टर ट्रेनर्स तयार करावेत, असेही ते म्हणाले.

प्रत्येक कॅमेरा सॉफ्टवेअरशी जोडा...

वेगमर्यादा तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलीस आणि शहर वाहतूक विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे इंटरसेप्टर वाहनासाठीचा प्रस्ताव तात्काळ द्यावा. या रस्त्यावर प्रत्येक मार्गिकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असून ते पोलीस विभागाच्या सॉफ्टवेअरशी जोडावेत, जेणेकरुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करता येईल, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या

सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget