एक्स्प्लोर
सिंहगड घाटात दरड कोसळली, वाहतूक पूर्णपणे बंद
सिंहगड जाणाऱ्या मार्गावरील घाटात भली मोठी दरड कोसळली आहे. यामुळे सिंहगडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, गडावर मोठ्या संख्येने पर्यटक आडकले आहेत.
पुणे : सिंहगड जाणाऱ्या मार्गावरील घाटात भली मोठी दरड कोसळली आहे. यामुळे सिंहगडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, गडावर मोठ्या संख्येने पर्यटक आडकले आहेत.
आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर मोठी दरड कोसळली. मात्र या धोकादायक दरडीचा वेळीच अंदाज आल्यानं सुरक्षारक्षकांनी दरड कोसळण्याआधीच या भागातली वाहतूक बंद केली. ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सुट्टीच्या काळात वर्षा सहलीनिमित्त सिंहगडावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. आज गडावर अनेक पर्यटक फिरायला आले होते. त्यामुळे पर्यटकांची ही गर्दी लक्षात घेऊन, गडाच्या खाली सुरक्षारक्षकांनी टप्पा वाहतूक पद्धत सुरु केली आहे.
दरम्यान, या रस्त्यावरुन आता केवळ दुचाकीची वाहतूक सुरु करण्यात आल्यानं, अजूनही अनेक पर्यटक सिंहगडावर अडकून पडल्याची माहिती आहे.
दरड कोसळतानाची दृश्य पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement