एक्स्प्लोर

Shasan Aplya dari Jejuri : जेजुरीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम; 7 ऑगस्ट रोजी वाहतुकीत बदल

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे 7 ऑगस्ट रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.

Shasan Aplya Dari Jejuri : पुरंदर तालुक्यातील जेजुरी (Jejuri Shashan Aplya Dari) येथे 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) आणि जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन (jejuri) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने आणि अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.

वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून 5 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड आणि इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. 

जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक

सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड व इतर - वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापुर महामार्ग क्रमांक 65 वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे. 

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजुकडे जाणारी जड, अवजड आणि इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव- सुपा- केडगाव चौफुला मार्गे पुणे- सोलापूर महामार्ग क्रमांक 65 वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.  

सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक 

पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण - सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा - फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे- वीर- वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे. 

वाहतुकीस लावलेले निर्बंध 7 ऑगस्ट रोजीच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mumbai Alert : मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? पोलिसांना फोन, ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thorat Majha Katta| देशमुखांच्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात, जयश्री थोरात माझा कट्टावरRaj Thackeray Full Speech Prabhadevi:लेकासाठी बापाचं पहिलं भाषण;राज ठाकरेंनी धू धू धुतलं : ABP MajhaAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : सना मलिकांना उमेदवारी कशी मिळाली? Nawab Malik ExclusiveYogendra Yadav Vastav EP 103|भाजप विरोधी पक्षांना सामाजिक चळवळींचे स्वरूप येण्याची गरज-योगेंद्र यादव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Mahendra Thorave : अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला आमदार महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Embed widget