एक्स्प्लोर

शरद पवारांचे म्हणणे खरे करुन दाखवले; विकास लवांडेंवरील हल्ल्यानंतर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, दावनेंकडूनही निषेध

सुषमा अंधारे यांनी ट्विट करुन विलास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे शरद पवारांचे वक्तव्य सत्य असल्याचं उघड झाल्याच म्हटलं.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande Attack) यांच्यावर स्वत:ला वारकरी, महाराज म्हणणाऱ्या संग्राम भंडारे यांच्याकडून शाईफेक हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी आपणास धमकीही देण्यात आल्याचे लवांडे यांनी म्हटले. या शाईफेकीचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यानंतर, शाईफेक करणारे संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे या घटनेवरुन राजकीय वातावरणही तापलं आहे. मंत्री नितेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांनी संग्राम भंडारेंचं समर्थन केलंय. तर, महाविकास आघाडीतील नेत्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी विकास लवांडेंचं अभिनंदन केलंय. 

सुषमा अंधारे यांनी ट्विट करुन विलास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे शरद पवारांचे वक्तव्य सत्य असल्याचं उघड झाल्याच म्हटलं. सुषमा अंधारे म्हणाल्या की, कामक्रोधमधमोहमत्सर या पासून संत संप्रदाय प्रचंड लांब असतो. संत तुकोबाराय संत ज्ञानेश्वर यांचा सांप्रत समाजाने अतोनात छळ केला मात्र उपरोक्त संतांनी कधीही कुणाचे अहित चिंतले नाही. माणूस विकार मुक्त झाला पाहिजे यासाठी ते कायम सम्यक विचार मांडत राहिले. आज आपल्या सोबत जे काही आळंदीत घडले हा एका अर्थाने आपला विजय आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या नावाखाली झालेली घुसखोरी आणि ज्यांना वारकरी संप्रदायाचा नेमका विचारच कळला नाही अशा नकली लोकांचे बुरखे फाडण्यात आपण यशस्वी झाला, असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं.        

शरद पवारांचे म्हणणे खरे ठरले (Sushma andhare on vikas lawande)

वारकरी संप्रदायामध्ये हिंसक विचारांच्या लोकांची घुसखोरी झाली आहे हे पवार साहेबांचे म्हणणे या मंडळींनी पुन्हा एकदा खरे करून दाखवले. आता आपण अजून एक काम करूया. अशा लोकांवर पोलीस कारवाई व्हावी किंवा कायदेशीर त्याच्यावर गुन्हे दाखल  व्हावे अशी कुठलीही अपेक्षा मागणी आपण कुणीही करू नये. कारण जिथे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा एफ आय आर लिहून घेतला जाऊ शकत नाही आणि यावर त्यांच्याच पत्नी असणाऱ्या उपमुख्यमंत्री, किंवा खासदार मुलगा , चकार शब्दाने बोलू शकत नाही अशा राज्यात आपण आपली एफ आय आर व्हावी यासाठी प्रयत्न करणे शुद्ध वेडेपणा आहे. 
       
उलट जे जे लोक अशा पद्धतीच्या कृती करतात त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या समारंभांमध्ये पहिल्या रांगेच्या खुर्च्यांमध्ये बसवावे.  त्यांचे पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन सत्कार समारंभ घडवून आणावेत. शक्य झालं तर सत्तेतल्या काही लाभाच्या जागा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देता येतात का? हे सुद्धा बघावे. प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकणारे असतील किंवा हनुमंत पवारला मारहाण करणारे असतील किंवा तुम्हाला दहापेक्षा दाखवणारे लोक असतील अशा सगळ्या लोकांना अधिकाधिक राजाश्रय कसा मिळेल आणि त्यांचा सत्कार सन्मान कसा होईल यासाठी उलट आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे सगळे मिळून मागणी करूया, असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

विकास लवांडेंची भूमिका योग्य, दानवेंकडून समर्थन

विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा प्रकार चुकीचा आहे, विकास लवांडे यांची भूमिका चुकीची नाही. वारकरी संप्रदाय हा वेगळ्या विचारांचा संप्रदाय आहे. मात्र, आत्ताच्या घडीला वारकरी संप्रदायात काही प्रतिगामी शक्ती आल्या आहेत, त्यांना सगळे समान असायला हवे. संताची भूमिका आता सांभाळली जात नाही, या भूमिकेत काही चूक वाटत नाही, असे म्हणत अंबादास दानवे यांनी विलास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेचा निषेध करत लवांडे यांचं समर्थन केलंय. वारकरी संप्रदायातील अनेकजण भाजपची चाकरी करतात, असेही दानवे यांनी म्हटलं.  

हेही वाचा

विकास लवांडे शाईफेक प्रकरणात पोलिसांची पहिली मोठी कारवाई; संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यावर गुन्हा दाखल

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget