एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सगळ्या जगाला माहितीय माझी जात कोणती; व्हायरल जातीच्या दाखल्यावर स्पष्टच बोलले शरद पवार

सगळ्या जगाला माहितीय माझी जात काय, असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वतः भर पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे.

Sharad Pawar PC : जन्मानं दिलेली जात मी लपवत नाही, सगळ्या जगाला माहितीय माझी जात काय आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झालेल्या खोट्या जातीच्या दाखल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलताना मराठा तरुणांची भावना तीव्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत. आज दिवाळी पाडव्याचा (Diwali Padwa) गोविंदबागेतील कार्यक्रम आटोपल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "गेली 50 वर्षही पद्धत्त आहे. पाडव्याच्या दिवशी लोक बारामतीत येतात. गेल्या काही वर्षांत त्यात वाढ झाली आहे. यंदाचं वर्ष वेगळं आहे. कारण यापूर्वी लोक पाडव्यासाठी यायचे, आता पाडव्यापूर्वी लोक येतात आणि सांगतात पाडव्याच्या दिवशी गर्दी खूप असते, त्यामुळे आम्ही आधीच येऊन भेटून जातो. आजकाल दोन दिवस आधीही लोक येतात. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण इथून लोक आले आणि शुभेच्छा दिल्या. यावर्षी अलेल्यांपैकी 70 टक्के लोक तरुण होते. हे या वेळचं वैशिष्ट्य. तरुणांच्या भवितव्यासाठी काय करता येईल त्याचा प्रयत्न करेन." 

मराठा तरुणांची भावना तीव्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही : शरद पवार 

मराठा आरक्षणाबाबतही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. मराठा तरुणांची भावना तीव्र आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्याचं काम करू, असं म्हणत शरद पवारांनी मराठा समाजाला आश्वासनही दिलं आहे. पुढे बोलताना मराठा ओबीसीत वाद नाही, मात्र काही लोक तसं वातावरण तयार करत आहेत. लोकांचे न्याय प्रश्न मात्र सुटले पाहिजेत, असं ते म्हणाले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती, त्या बैठकीला राज्यातील विविध पक्षांचे प्रमुख नेते होते. आरक्षणाच्या पुर्ततेची प्रक्रिया पुर्ण करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले असल्याचंही शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं. 

सगळ्या जगाला माहितीय माझी जात काय : शरद पवार 

काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या जातीचा खोटा दाखला सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. याबाबतही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, "माझा जातीचा बोगस दाखला व्हायरल झाला होता. माझा इंग्रजीमधील दाखला काही जणांनी फिरवला. त्यावर ओबीसी लिहलं होतं. जन्मानं दिलेली जात मी लपवत नाही. सगळ्या जगाला माहितीय आहे, माझी जात काय आहे." 

दरम्यान, आज शरद पवारांच्या गोविंद बागेत आज दिवाळी पाडवा पार पडला. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच दिवाळी पाडवा पार पडला. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार करण्यात आला.

पाहा व्हिडीओ : Sharad Pawar Full PC Baramati : सगळ्या जगाला माझी जात माहितीये, गोविंद बागेतील मंचवरुन घणाघात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 27 November 2024JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलाDelhi Meeting On Maharashtra Cabinet:  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget