एक्स्प्लोर

Sharad Pawar: स्त्रियांवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच...; शरद पवारांचा भर पावसात इशारा

Sharad Pawar in MVA Muk Morcha: आज पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन केले होते.

पुणे: बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेली लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याच विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी 'निषेध आंदोलन' केले जात आहे. आज पुण्यातही भर पावसात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मूक आंदोलन केलं. या आंदोलनात शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे(Supriya Sule), काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील घटना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला दिला. त्याचबरोबर उपस्थितांना एक शपथ घ्यायला लावली. महिलांवर कधीही अत्याचार करणार नाही, करू देणार नाही अशा आशयाची ही शपथ होती. यावेळी मविआचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या घटनेने देशभरात महाराष्ट्राच्या लौकिकाला मोठा धक्का 

राज्यात घडत असलेल्या बदलापूरसारख्या अस्वस्थ करणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या छत्रछायेखाली एकत्र आलो आहोत. बदलापूरला बालिकेवर अत्याचार झाला. या घटनेने देशभरात महाराष्ट्राच्या लौकिकाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील मुली- महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारवर आहे, याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली नाही. बदलापूरमधील घटनेचा निषेध होत असतानाच राज्यात घडलेल्या इतर ठिकाणच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात दररोज अशा घटना घडत आहेत, असं शरद पवारांनी (Sharad Pawar)मूक मोर्चानंतर बोलतान म्हटलं आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र हे शिवछत्रपतींचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी माहाराजाच्या काळात एका भगिनीवर अत्याचार केल्याची तक्रार  महाराजांकडे गेली होती. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात कलम करण्याचे आदेश दिले. तसंच आता जे काही घडलं आहे. त्याची गांभिर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे. संवेदनशीलपणे या गोष्टी हाताळल्या पाहिजेत, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

पुण्यात भर पावसात मूक मोर्चा

बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी मुक आंदोलनं केली जात आहेत. पुण्यात भर पावसा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं ‘निषेध आंदोलन’ करण्यात आलं आहे. तोंडाला काळा मास्क लावून आणि हाताला काळी फीत बांधून शरद पवार यांच्यासह अन्य महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अनेक नेते यावेळी पावसात भिजल्याचं दिसून आलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News: नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Scheme benefits : लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशांचा योग्य विनियोगSitaram Yechury Death : ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन, सीताराम येचुरींचा परिचयBhagyashri Aatram : धर्मरावबाबा आत्रामांची कन्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत Special ReportWare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा  : 12 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
नवऱ्याच्या प्रेयसीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही; हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
बीसीसीआयकडून विराट कोहली इतकाच पगार चार खेळाडूंना मिळतो; एकाच वर्षांत करोडोंची कमाई
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
मोठी बातमी! विदर्भात महायुतीला फटका बसणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेत धक्कादायक माहिती, कोणत्या पक्षाला किती जागा?
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Embed widget