Sharad Mohol: शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवा, सकल हिंदू समाजाची मागणी
शरद मोहोळच्या हत्येच्या कटामागचा सूत्रधार पोलिसांनी शोधला पाहिजे. पुण्यात एका हॉटेलमध्ये कट रचला त्याचा सीसीटीव्ही सापडत नाही,याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.
पुणे : शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) हत्याकांडप्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. पुण्यात एका हॉटेलमध्ये कट रचला मात्र त्याचा सीसीटीव्ही सापडत नाही. तसेच गाडीत पैसे सापडले त्याचा तपास होत नाही, पिस्तुल सापडला त्याचा तपास नाही, कारण यामागे राजकीय दबाव असण्याची शक्यता असल्याचा आरोप हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केला आहे. तसेच मोहोळ हत्या तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मिलिंद एकबोटे म्हणाले, महाराष्ट्रातील हिंदूत्ववादी संघटनेतर्फे 28 जानेवारीला पुण्यात एक जन मोर्चा काढला जाणार आहे. किनारा हॉटेल ते श्री शिवाजी महाराज स्मारक कोथरूड येथपर्यंत मोर्चा असणार आहे. हिंदुत्वविरोधी लोकांनी वापरले आणि टोळीयुद्ध आहे अस दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपुरी माहिती होती त्यामुळे त्यांना सर्व माहिती देण्यात आली आहे. स्वाती मोहोळ यांनी संपूर्ण माहिती फडणवीस यांना दिली आहे. राजकारण आणि समाजकारणामध्ये शरद मोहोळ याचा कोणाशी वाद नव्हता.
शरद मोहोळ यांनी गो रक्षण चळवळ वाढवली
शरद मोहोळच्या हत्येच्या कटामागचा सूत्रधार पोलिसांनी शोधला पाहिजे. पुण्यात एका हॉटेलमध्ये कट रचला त्याचा सीसीटीव्ही सापडत नाही,याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. गाडीत पैसे सापडले त्याचा तपास होत नाही,पिस्तुल सापडला त्याचा तपास नाही. यामागे राजकीय दबाव असण्याची शक्यता आहे. शरद मोहोळ यांनी गो रक्षण चळवळ वाढवली होती. अतिरेकी संघटनांचे काही कटकारस्थान केलं का अशी शंका आहे. शरद मोहोळ यांच्या हत्येमागील कट कारस्थाने उघडकीस आणले पाहिजे, असेही मिलिंद एकबोटे म्हणाले.
शरद मोहोळ हत्याकांडप्रकरणी एकूण 24 आरोपींना अटक
शरद मोहोळ हत्याकांडमधील मुख्य आरोपी रामदास मारणेला अटक करण्यात आली आहे. मोहोळ हत्याप्रकरणी एकूण 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत नवी मुंबई पोलीसांना मोठ यश मिळाले आहे. पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केलीय. विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे यासह दहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केलीय. शेलार आणि मारणे यांचा शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात सहभाग असल्याच तपासात निष्पन्न झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शरद मोहोळच्या हत्येनंतर हे सर्व आरोपी पनवेल आणि वाशी भागात लपून बसले होते.
हे ही वाचा :