Pune University: ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘जेएनयू’पेक्षाही डावे…', ‘जेएनयू’च्या कुलगुरूंचं विधान चर्चेत
Pune University: ‘मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम केलं आहे. तिथं शिकल्यावर तर कुठेही राजकारण करता येईल. त्या जोरावरच मी ‘जेएनयू’मध्ये चांगलं काम करू शकले,’ असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) जेएनयूपेक्षाही डावे असल्याचं वक्तव्य जेएनयूच्या कुलगुरू डॉ शांतिश्री पंडीत यांचं विधान सध्या चर्चेत आलं आहे. वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यान मालेतील वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. ‘मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) काम केलं आहे. तिथं शिकल्यावर तर कुठेही राजकारण करता येईल. त्या जोरावरच मी ‘जेएनयू’मध्ये चांगलं काम करू शकले,’ असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. दहा वर्षे ‘आपले’ सरकार असतानाही डाव्यांची परिसंस्था सुरू असून, आपल्यालाही स्वतंत्र विचारवंत आणावे लागतील,’ असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
...ती परंपरा संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलली
'जेएनयूमध्ये आजपर्यंत एकही स्त्री कुलगुरू झाली नाही. ही परंपरा संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलली आहे. त्यांनी नारीशक्तीबाबत जे बोलले, ते करून दाखवले. 'जेएनयू'ने आयआयएम, आयआयटींना क्रमवारीत मागं टाकलं आहे. 'जेएनयू'ला सर्वोत्तम शैक्षणिक क्रमवारी मिळवून दिलेली मी पहिली 'संघी' आहे. अनेक लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वापर करून पदे मिळवतात आणि नंतर लपवाछपवी करतात. पण, मी उघडपणे सांगते,'मी उघडपणे सांगते, मी संघाची' आहे, मी राष्ट्रसेविका समितीची आहे,' असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृति व्याख्यानात ‘नव्या युगातील भारतीय समाज : संधी आणि आव्हाने’ या विषयावर पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केलं.
आपल्या क्रांतिकारकांचा आपण सन्मान राखला पाहिजे
जेएनयूच्या कुलगुरू डॉ शांतिश्री पंडीत यांनी उजव्या-डाव्यांच्या राजकारणावर बोलताना म्हणाल्या, ‘डाव्यांचं कथन अतिशय मजबूत आहे. डावे लोकच क्रांतिकारी असू शकतात, असं आजपर्यंत पुढे आणण्यात आलं. मात्र, वासुदेव बळवंत फडकेही क्रांतिकारक होते, हे लोकांसमोर आणलं गेलं पाहिजे. पुण्यासारख्या बुद्धिवंतांच्या शहरातून हे कथन सुरू झालं पाहिजे. त्यासाठी लेखन करावं लागेल, बोलावे लागेल. स्वातंत्र्य चळवळ अहिंसक होती, हे दाखविण्यासाठी क्रांतिकारकांना बदनाम करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर हयात असेपर्यंत त्यांना ज्या प्रकारची वागणूक देण्यात आली, तो त्यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाचा अपमान होता, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे
राहुल गांधी, सोनिया गांधी यांना पोर्ट ब्लेअरला पाठवून...
तर राहुल गांधी, सोनिया गांधी यांना पोर्ट ब्लेअरला पाठवून त्या खोलीत ठेवा. कोणता काँग्रेस नेता मंडाले किंवा पोर्ट ब्लेअरला पाठवला गेला होता, सगळ्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट होती. तरीही, ते आज येऊन भाषणं करतात. आपल्या क्रांतिकारकांचा आपण सन्मान राखला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना आज धोक्यात आली आहे. धार्मिक लोकसंख्या असमतोल हे त्याचं कारण आहे. हिंदू बहुसंख्याक असेपर्यंतच भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश राहणार आहे.’
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
