(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'जिजाऊंची वारसदार करते भिडेचा धिक्कार', संभाजी भिडेंच्या 'त्या’ वक्तव्याचे तीव्र पडसाद, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आक्रमक
संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
पुणे : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. भिडे यांच्या या वक्तव्यावर सर्वसामान्य जनतेतून संतापाची तीव्र भावना व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar) आणि काँग्रेसने (Congress) भिडे यांच्या विरोधात पुण्यात जोरदार आंदोलन केलं आहे. कुठे भिडे यांच्या फोटोला चपला मारल्या जात आहेत. तर कुठे रास्ता रोको करून रोष व्यक्त केला जात आहे. महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भिडेंविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिली आहे.
संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप या आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रशांत जगताप म्हणाले, राज्य सरकारने भिडेंविरोधात कारवाई करावी अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय गुरु आहे. विकृत मनोवृत्तीचे माणूस आहे. महिलांच्या विरोधात वक्तव्य करतात. पुण्यतील वारी पवित्र आहे, वारीत येऊन त्यांनी वक्तव्य केलं. महिलांचा अपमान केला. मनोहर भिडेंना अटक करा अशी मागणी आहे. मनोहर भिडे यांची जागा तुरुंगात आहे. मनोहर भिडेचे कार्यकते हे वारीत धुडगुस घालतात
मनोहर भिडे हा धार्मिक आतंकवादी आहे.
संभाजी भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी
बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आंदोलन केलं. भिडेंचा फोटो घेऊन आंदोलन सुरू केलं. यावेळी संभाजी भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भिडे यांना अटक करण्याची मागणीही लावून धरण्यात आली. मी जिजाऊंची वारसदार करते भिडेचा धिक्कार, मनुवादी किडे मनोहर भिडे, माता भगिनींचा अपमान करणारा मनुवादी विकृत मनोहर भिडे आणि त्याला पाठीशी घालणारे मनुवादी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.
भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्यविरोधात पुण्यात काँग्रेस रस्त्यावर
भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्यविरोधात पुण्यात काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. पुण्यातील फडके हौद चौकात आंदोलन काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून भिंडेच्या फोटोला जोडे मारण्यात येत आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. संभाजी भिडे यांनी महिलांविषयी वक्तव्य करून त्यांचा अवमान केला आहे. सरकार संभाजी भिडे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने या वेळी केला आहे.
हे ही वाचा :