एक्स्प्लोर
आर्ची-परशाच्या चाहत्यांना पिंपरीत लाथा-बुक्क्यांचा चोप

पुणे: दहीहंडीच्या निमित्ताने आर्ची-परशा आणि सैराटची टिम पिंपरीतील भोसरीमध्ये दाखल झाली होती. सगळ्या महाराष्ट्राला झिंगाट करणारी सैराटची टिम आल्यामुळे दहीहंडीचा उत्साह आणखी वाढला. मात्र, चाहत्यांचा उत्साह सांभाळण्यात कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ आले. प्रेक्षकांना आवरता आलं नाही म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चक्क चाहत्यांना लाथा-बुक्यांचा चोप दिला. यावेळी काही चांहत्यांमध्ये झटापटही झाली. आमदार महेश लांडगेही यावेळी मंचावर उपस्थित होते. अवघ्या १५ मिनिटांतच सैराटच्या टीमनं निरोप घेतल्यामुळं चाहते नाराज झाले. भोसरीत काल अगदी सात वाजल्यापासूनच आर्ची आणि परश्याची चाहते वाट पाहत होते. अखेर रात्री साडे नऊ वाजता त्यांची प्रतीक्षा संपली आणि सैराटची टीम दाखल झाली. त्यानंतर उपस्थितांच्या भावनांचा बांध फुटला आणि सर्वच जण झिंगाट झाले. या सर्वांना सावरण्यासाठी पोलीस बंदोबस्त ही तैनात होता. पण चाहत्यांचा रेटा बराच होता. त्यामुळे त्यांना आवरण्यासाठी कार्यकर्त्यांनीच थेट कायदा हातात घेतला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























