Pune News Kidney Racket: रुबी हॉस्पिटल किडनी प्रत्यारोपण प्रकरण विधानसभेत गाजलं! उपमुख्यमंत्री म्हणाले, ...तर हॉस्पिटलचा परवाना रद्द
किडनी प्रत्यारोपणाचं प्रकरण गंभीर आहे. एक महिन्यात अंतिम अहवाल देऊ आणि ज्यांनी कारवाई करण्यात दिरंगाई केली असेल त्यांच्यावर देखील कारवाई करण्यार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.
![Pune News Kidney Racket: रुबी हॉस्पिटल किडनी प्रत्यारोपण प्रकरण विधानसभेत गाजलं! उपमुख्यमंत्री म्हणाले, ...तर हॉस्पिटलचा परवाना रद्द Ruby Hospital Kidney Transplant Case hospitals and doctors' licenses will be revoked Pune News Kidney Racket: रुबी हॉस्पिटल किडनी प्रत्यारोपण प्रकरण विधानसभेत गाजलं! उपमुख्यमंत्री म्हणाले, ...तर हॉस्पिटलचा परवाना रद्द](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/d9a37a202fe02d912a4eb1f21cee4c38166080555361184_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune News Kidney Racket: रुबी हॉस्पिटलमध्ये (Ruby Hall Clinic) बनावट किडनी (Kidney Racket) प्रत्यारोपणाची पाच प्रकरणं उजेडात आली होती. त्यानंतर या हॉस्पिटलची चौकशी सुरु होती. या प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सभागृहात गदारोळ निर्माण झाला. पुणे रुबी हाॅल क्लिनिक किडनी प्रत्यारोपण प्रकरणी इनामदार हाॅस्पिटल, पुणे आणि ज्युपिटर हाॅस्पिटल ठाणे याचा सहभाग असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. या सगळ्या प्रकरणासंदर्भात योग्य कारवाई केली जाईल आणि त्यांच्या परवान्या संदर्भातदेखील कारवाई केली जाणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे
मे महिन्यात हे प्रकरण उघडकीस आलं होतं. त्यानंतर आता 3 महिन्यांनतर देखील कारवाई झाली नाही त्यामुळे विरोधकांनी यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. किडनी प्रत्यारोपणाचं प्रकरण गंभीर आहे. एक महिन्यात अंतिम अहवाल देऊ आणि ज्यांनी कारवाई करण्यात दिरंगाई केली असेल त्यांच्यावर देखील कारवाई करण्यार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.
या सगळ्या प्रकरणात हॉस्पिटलचा सहभाग असेल तर त्यांचा परवाना रद्द केला जाईल मात्र डॉक्टरांचा सहभाग असेल तर त्या डॉक्टरांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत सर्व प्राथमिक माहिती बाहेर आली आहे. सगळी चौकशी झाली की योग्य ती कारवाई करुन या प्रकरणा ज्यांंचा सहभाग असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
आतापर्यंत या प्रकरणात 15 जणांवर गुन्हा नोंद
पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे (Ruby Hall Clinic) प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह हॉस्पिटलमधील सहा डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. ज्या महिलेची किडनी काढण्यात आली ती महिलाही बनावट कागदपत्रं तयार करून यात सहभागी असल्याचं आढळून आल्याने तिच्यावरही पोलीसांनी गुन्हा नोंद केला होता. एकूण 15 जणांच्या विरोधात पुणे पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला होता.
संबंधित बातम्या :
Pune : अवयव प्रत्यारोपणाला ब्रेक?, पुण्यातील तस्करी प्रकरणानंतर डॉक्टरांमध्ये कारवाईची भीती
Pune : पुण्यातील किडनी तस्करी प्रकरण: रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह सहा डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)