एक्स्प्लोर

Ravindra Dhangekar on Murlidhar Mohol : तरी म्हटलं बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत? अग्रवालच्या FIR वर रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळांमध्ये आरोपांच्या फैरी

पोलिसांनी दोघांना चिरडूनही पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला दिलेल्या व्हीआयपी ट्रिटमेंट आणि अत्यंत हास्यापद पद्धतीने झालेला जामीन यावरून पुणे पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

Ravindra Dhangekar on Murlidhar Mohol : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या भीषण अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने 24 मेपर्यंत ( Pune Porsche Car Accident) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशाल अग्रवालसह पब मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांनाही न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघांना चिरडूनही पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला दिलेल्या व्हीआयपी ट्रिटमेंट आणि अत्यंत हास्यापद पद्धतीने झालेला जामीन यावरून पुणे पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. दरम्यान, पहिल्यांदा  दाखल करण्यात आलेल्या एफआयआरवरुन आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यात ट्विटवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. 

‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या

मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत म्हटले होते की, लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच! कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो. मंगळवारीही उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच ! ही 19 तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी ! कलम 304 त्यात आधीपासूनच आहे. त्यामुळे ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत.

तरी म्हटलं बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत?

यानंतर रवींद्र  धंगेकर यांनीही ट्विट करत मोहोळांवर पलटवार केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, तरी म्हंटल बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत ? कदाचित अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असतील म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे. आता तुम्हाला F.I.R आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का...? आमचं पहिल्या दिवसापासून एकच सांगणे आहे की F.I.R मध्ये  304 लावण्यात आलेला नाही.का नाही लावला...? सोबत पहिली F.I.R कॉपी जोडतोय.नीट वाचून घ्या. इथ 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत,त्यांच्या घरातली २ कमावते लोकं गेले आहेत त्यांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय....?

पुणेकर म्हणून तुम्ही पुण्याच्या जनतेसोबत राहाल अशी माझी अपेक्षा होती पण आतापासूनच बिल्डर अन पोलिसांच्या चरणी आपली निष्ठा वाहत आहात. 3-4 वाजेपर्यंत पोलिसांना माहिती असताना पब चालतात, तेव्हा कुठं गेलेलात ? गृहमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत.पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले असते तर हि घटना घडली नसती.

दरम्यान, पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या मुलाने बेदरकारपणे आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. ते दोघेही आयटी इंजिनीअर होते. धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलच्या पाठीमागे बसलेली तरुणी 15 फूट उडून रस्त्यावर आदळली होती. या अपघातात अनिश अवधिया (वय 27) आणि अश्विनी कोस्टा (वय 25) यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारीपहाटे अडीच वाजताच्या सुमारास कल्याणीनगर येथील लँडमार्क सोसायटीजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून दोघांना चिरडल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीचा वडिल विशाल अग्रवाल फरार झाला होता. त्याला पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतले. आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने विशाल अग्रवालला 24 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget