1 जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप
strike : राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षांपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. एक जानेवारी 2024 पासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप होणार आहे.
![1 जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप Ration shopkeepers on indefinite strike on 1 January Maharashtra news update 1 जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/31/3674d08d884b0fab3e8e6e37d9aa71bd1703990267378265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ration shopkeepers on indefinite strike : राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षांपासून बेमुदत संपावर (strike ) जाणार आहेत. एक जानेवारी 2024 पासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा (Ration shopkeepers ) बेमुदत संप होणार आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील संपावर असणार आहेत. त्यामुळे येत्या 1 जानेवारीपासून पुण्यासह महाराष्ट्रातील रेशनदुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत.
राज्यात सुमारे 53 हजार रास्त भाव दुकानदार आहेत. त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याची टीका महासंघाकडून करण्यात आली. आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली नाही. महासंघाच्या निवेदनाची दखल घेत सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासने देण्यात आल्याचेही महासंघाकडून सांगितलं. सरकारकडून कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे महासंघाच्यावतीने नाईलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने एक जानेवारीपासून पुकारलेल्या संपात सहभाग होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.
कोणत्या मागण्यासाठी रेशन दुकानदारांनी संप पुकारला ?
रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी 50 हजार करा
मार्जिन मनी ३०० रुपये करा
टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या
कालबाह्य नियम बदला
आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवून कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा, यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये आता अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने उडी घेतली आहे. त्यामुळे येत्या एक जानेवारीपासून राज्यातील सर्वच रेशनदुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत. रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा, टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या, कालबाह्य नियम बदला, यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील रेशन दुकानदार संपावर जाणार असल्याचे पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी सांगितले.
आणखी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)