3 तिघाडी, काम बिघाडी... महाराष्ट्रसह तीन राज्यात जागावटपावरुन पेच, काँग्रेसचा डाव फसणार?
Congress Seat Sharing : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावटपावर लवकरच लवकर चर्चा व्हावी, असे इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरलेय. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांचं जागावाटपावर एकमत होणं, गरजेचं आहे.
Congress Seat Sharing : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावटपावर लवकरच लवकर चर्चा व्हावी, असे इंडिया आघाडीच्या बैठकीत ठरलेय. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांचं जागावाटपावर एकमत होणं, गरजेचं आहे. पण काँग्रेससाठी जागावाटप अतिशय कठीण झालेय. कारण, तीन राज्यातील स्थानिक पक्षांनी जास्त जागांची मागणी केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.
इंडिया टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टीने (आप) म्हटलेय की लोकसभा निवडणुका आम्हाला स्वबळावर लढवायची आहे. त्याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनीही स्वबळावर निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 23 जागांवर दावा केलाय. महाराष्ट्र, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील परिस्थिती पाहाता लोकसभा निवडणुका काँग्रेससाठी कठीण जाऊ शकतात.
टीएमसी स्वबळावर निवडणूक लढवणार - ममता बनर्जी
आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा ममता बनर्जी यांनी गुरुवारी केली. पण देशस्तरावर त्या इंडिया आघाडीचा भाग असतील. राज्यात निवडणूक अभियान सुरुवात करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "इंडिया आघाडी देशभर राहील. टीएमसी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवेल आणि भाजपचा पराभव करेल. टीएमसी हा एकमेव असा पक्ष आहे जो भाजपला धडा शिकवू शकतो."
ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर असे दिसतेय की त्या इंडिया आघाडीत जागावाटपाबाबत कोणताही तडजोड होणार नाही. 2019 लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी सीपीआय-एमसोबत आघाडीबाबत चर्चा केली होती. पण काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवली होती. काँग्रेसला 42 जागांपैकी फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला होता. टीमसीने 22 जागा जिंकल्या होत्या.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी 23 जागा मागवल्या -
2024 लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. इंडिया आघाडीसाठी महाराष्ट्र हे महत्वाचं राज्य आहे. काँग्रसने महाराष्ट्रात ताकद वाढवण्यासाठी तयारीही सुरु केली आहे. काँग्रेसनं स्थपना दिवस नागपूरमध्ये केला. तर भारत न्याय यात्राचा समारोप मुंबईमध्ये होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभासाठी 23 जागांची मागणी केली. काँग्रेसच्या नेत्यांनी ही मागणी फेटाळली.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही महाविकास आघाडीत पक्षांमध्ये एकीची गरज असल्याचं सांगितलं. त्याशिवाय शिवसनेची सध्याची मागणी खूप जास्त असल्याचे म्हटलेय. 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादगी यांनी एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. 48 जागांमध्ये काँग्रेसला फक्त एक जागा जिंकता आली तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या. शिवसेनेला भाजपसोबत निवडणूक लढवली होती. शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या, त्यामध्ये 18 जागांवर त्यांचा विजय झाला होता.
पंजाबमध्ये आपचा स्वबळाचा नारा -
पंजाबमध्ये आम आदमी पार्टी पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इरादा स्पष्ट केलाय. 26 डिसेंबर रोजी आप आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली, यामध्ये आपने आपली भूमिका स्पष्ट केली. 17 डिसेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये रॅली केली. या रॅलीमध्ये केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत आपला 13 जागा जिंकून द्या, अशी पंजाबमधील लोकांना आवाहन केलेय. लोकसभा 2019 मध्ये पंजाबमधील 13 जागांपैकी काँग्रेसने 8 तर आपने 1 जागा जिंकली.